26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रचारचाकी गाडी खरेदी व्यवहारातील वादातून गावठी कट्ट्यातून गोळीबार

चारचाकी गाडी खरेदी व्यवहारातील वादातून गावठी कट्ट्यातून गोळीबार

विकलेल्या चारचाकी गाडीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील वादातून एकावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची घटना नेवासा तालुक्यातील टोका शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्ञानेश्वर कचरु तोडमल (वय 39) रा नेवासा बुद्रुक यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 2 जून रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास मी व माझा मेव्हुणा शुभम सोमोशी असे आम्ही माझेकडील मारुती कंपनीची सियाज चारचाकी (एमएच 16 बीसी1745) मधून नेवासा बुद्रुककडे येत असताना सिध्देश्वर मंदिराचे पुलाजवळील रोडवर लघुशंकेला थांबलो असताना तेथे आमचे गाडीजवळ एक थार (एमएच 20 जीआर 2007) व पांढर्‍या रंगाची स्क्रेटा अशा दोन गाड्या आमच्या जवळ येवून थांबल्या.

विकलेल्या चारचाकी गाडीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील वादातून (four-wheeler purchase deal) एकावर गावठी कट्ट्यातून गोळीबार (Firing) केल्याची घटना नेवासा तालुक्यातील टोका शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्ञानेश्वर कचरु तोडमल (वय 39) रा नेवासा बुद्रुक यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 2 जून रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास मी व माझा मेव्हुणा शुभम सोमोशी असे आम्ही माझेकडील मारुती कंपनीची सियाज चारचाकी (एमएच 16 बीसी1745) मधून नेवासा बुद्रुककडे येत असताना सिध्देश्वर मंदिराचे पुलाजवळील रोडवर लघुशंकेला थांबलो असताना तेथे आमचे गाडीजवळ एक थार (एमएच 20 जीआर 2007) व पांढर्‍या रंगाची स्क्रेटा अशा दोन गाड्या आमच्या जवळ येवून थांबल्या.(Firing from village over dispute over four-wheeler purchase deal)

या गाडीमधून किशोर दिंगबर आवारे रा. भायगाव गंगा (ता. वैजापूर), किशोर हरिश्चंद्रे, रा. लासुर, (ता. गंगापूर), गणेश दिनकर कदम रा. भागयगाव गंगा (ता. वैजापूर), व विठ्ठल दिंगबर आवारे रा. भायगाव गंगा तसेच अनोळखी 3 ते 4 इसम खाली उतरुन मला लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केली. तेव्हा किशोर दिंगबर आवारे याने त्याचेकडील गावठी कट्टा काढला असता त्यास किशोर हरिश्चंद्रे म्हणाला की, त्याला जीवेच मार, हा लई माजला आहे असे म्हणाला असता मी किशोर आवारे यांचे हाताला झटका देवुन पळून जात असताना किशोर आवारे यांने त्याचेकडील गावठी कट्टयातून माझे दिशेने गोळीबार (Firing) करुन मला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी अंधाराचा आसरा घेवून लपून बसलो. त्यानंतर त्यांनी माझेकडील सियाज गाडी घेवुन जात असताना थोड्या अंतरावर गाडी डिव्हायडरला धडकल्याने सियाज गाडी तेथेच सोडुन ते त्याचेकडील गाडीसह पळुन गेले.

सदर ठिकाणी पोलीस आल्यानंतर आम्ही झालेला प्रकार सांगितला असता पोलिसांनी घटनाठिकाणची पाहणी केली. तेथे एक गावठी कट्टा, दोन जिवंत राऊड, एक खाली पुगळी दिसून आली. त्यानंतर नुकसान ग्रस्त गाडीसह मी व माझा मेव्हुणा शुभम सोमोशी असे आम्ही नेवासा पोलीस स्टेशन येथे आलो. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 307, 323, 141, 147, 148, 149, 504, 506, आर्म अ‍ॅक्ट 3/27 प्रमाणेग गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी