30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा रशिया येथे नदीत बुडून मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा रशिया येथे नदीत बुडून मृत्यू

रशिया देशातील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेले जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी वोल्खोव्ह नदीच्या किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. त्यावेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दुतावासातील कुमार गौरव (आय.एफ.एस) यांच्याशी संपर्क करून सर्व सर्व माहिती जाणून घेतली.

रशिया देशातील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेले जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी वोल्खोव्ह नदीच्या किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. त्यावेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून (drown) मृत्यू झाला असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया (river in Russia) येथील दुतावासातील कुमार गौरव (आय.एफ.एस) यांच्याशी संपर्क करून सर्व सर्व माहिती जाणून घेतली.(Three students drown in river in Russia)

तसेच निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी पालकांना तिथल्या प्रशासनाशी संपर्क करून दिला आहे.
प्राथमिक माहिती नुसार हर्षल अनंतराव देसले (भडगाव), जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी (अमळनेर) येथील विद्यार्थी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते.

हे तिघे आणि त्यांचे सहअध्यायी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या मोकळ्या वेळेत संध्याकाळी वोल्खोव्ह नदीच्या किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. त्यावेळी ही शोकांतिका अपघाती आणि अनपेक्षित घडल्याचे कळते. सध्या रशियन फेडरेशनमधील सर्व संबंधित एजन्सीं पुढील कार्यवाही करत आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने विदेश मंत्रालयाशी संपर्क करून रशियातील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क केला. भारतीय दुतावासाने संबंधित विद्यापीठाशी संपर्क करून माहिती जाणून घेतल्याचे सांगितले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. पालकांना पूर्ण ते सहकार्य करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने भारतीय दुतावासच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी