30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeआरोग्यआता घरबसल्या बनवा नखांना सुंदर आणि मजबूत 

आता घरबसल्या बनवा नखांना सुंदर आणि मजबूत 

नखे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यासारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांची गरज असते. त्यामुळे त्यांना निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार योजना पाळली पाहिजे. (keep nails strong and beautiful)

स्त्रियांना आपली सुंदरता सर्वात जास्त प्रिय असते. त्या कुठे जायचं असेल तर केसांपासून तर पायापर्यंत छान तयार होतात. स्त्रियांचे हात देखील सुंदर असतात. त्यात तात्यांचे नखे महत्वाची भूमिका बजवतात. नखे सुंदर आणि लांब असतील तर ते आकर्षक दिसतील. अशा परिस्थितीत प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिची नखे मजबूत राहावीत, जेणेकरून ती पुन्हा पुन्हा तुटू नयेत आणि तिच्या हातांचे सौंदर्यही अबाधित रहावे. (keep nails strong and beautiful)

नखे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यासारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांची गरज असते. त्यामुळे त्यांना निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार योजना पाळली पाहिजे. (keep nails strong and beautiful)

यासोबतच नखे स्वच्छ ठेवणे आणि त्यांना हार्ड केमिकल्सपासून वाचवणेही महत्त्वाचे आहे. यासोबतच काही घरगुती उपाय करून आपण त्यांना मजबूत ठेवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया नखे ​​मजबूत कसे बनवायचे. (keep nails strong and beautiful)

पावसाळ्यात अशी घ्या आपल्या त्वचेची काळजी

खोबरेल तेल
अँटिऑक्सिडंट-समृद्ध खोबरेल तेलात व्हिटॅमिन ई देखील भरपूर असते. ते थोडे गरम झाल्यावर रोज लावल्याने नखांची चांगली वाढ होते. (keep nails strong and beautiful)

लिंबाचा रस
व्हिटॅमिन सी नखांचे आरोग्य राखण्यास मदत करते. त्यामुळे त्याचा रस दिवसातून एकदा हाताच्या बोटाला आणि नखांना लावा आणि काही वेळाने कोमट पाण्याने धुवा. (keep nails strong and beautiful)

संत्र्याचा रस
अँटिऑक्सिडेंट-समृद्ध संत्र्याचा रस नखांचे आरोग्य वाढवतो आणि संसर्गापासूनही संरक्षण करतो. त्यामुळे याच्या रसाचे काही थेंब तुमच्या पायाच्या आणि हातांच्या नखांवर लावा आणि काही वेळाने कोमट पाण्याने धुवा. (keep nails strong and beautiful)

त्वचेसाठी वरदान आहे भोपळ्याच्या बिया

बायोटिन घ्या
बायोटिन नखांचे आरोग्य राखते. त्यामुळे बायोटिन असलेल्या गोष्टींचे जास्त प्रमाणात सेवन करा. केळी आणि एवोकॅडो सारखे.

हिरव्या पालेभाज्या खा
हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने नखे निरोगी राहतात. त्यामुळे पालक, मेथी, ब्रोकोली या भाज्यांचे सेवन शक्य तितके करावे. (keep nails strong and beautiful)

लसूण तेल
लसणामध्ये सेलेनियम असते, जे नखांच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक असते. त्यामुळे मास्क म्हणून नखांवर लसूण पेस्ट किंवा तेल लावा. (keep nails strong and beautiful)

मध
मध आणि लिंबाचा रस मिसळा आणि मास्क म्हणून नखांवर लावा. संसर्गापासून त्यांचे संरक्षण करण्यासोबतच ते नखांचे क्यूटिकल निरोगी आणि मऊ ठेवतात.

ऑलिव्ह तेल
कमकुवत नखे पुन्हा निरोगी करण्यासाठी नखांवर ऑलिव्ह ऑईल लावा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी