29 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeटॉप न्यूजकेंद्राच मोठा निर्णय : पबजीसह ११८ अ‍ॅप्सवर बंदी; एका क्लिकवर वाचा संपूर्ण...

केंद्राच मोठा निर्णय : पबजीसह ११८ अ‍ॅप्सवर बंदी; एका क्लिकवर वाचा संपूर्ण यादी

टीम लय भारी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पबजीसह 118 अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून या आधी 100 पेक्षाजास्त अधिक चीनी अँप्सवर बंदी घातली होती. भारताचं सार्वभौमत्व, सुरक्षेशी संबंधित गोष्टींमध्ये सहभागी असल्याने ही कारवाई करण्यात आली.


केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं पबजीसह 118 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. अ‍ॅप्सबद्दल ब-याच तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. राष्ट्रीय सुरक्षा विचारात घेऊन अ‍ॅप्सवर बंदी  घालण्याचा निर्णय घेतला गेला. अशी माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं दिली. विशेष म्हणजे जूनमध्ये टिकटॉक, हेलोसह 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदीची कारवाई करण्यात आली होती. जुलैमध्ये 47 चिनी अप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पबजीसह लिविक, वीचँट रिडिंग, अ‍ॅपलॉक, कँरम फ्रेंड्स सारख्या मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

गलवान खोऱ्याप्रमाणे पँगाँग सरोवर परिसरातही चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केल्याने भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव पुन्हा एकदा वाढला असल्याचं चित्र आहे.  त्यामुळेच केंद्राने ही अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी