30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeटॉप न्यूजdigital strike : केंद्र सरकारचा आणखी एक डिजिटल स्ट्राईक, तब्बल ४३ अ‍ॅप्सवर...

digital strike : केंद्र सरकारचा आणखी एक डिजिटल स्ट्राईक, तब्बल ४३ अ‍ॅप्सवर बंदी

टीम लय भारी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणखी एक मोठा डिजिटल स्ट्राईक (digital strike) केला आहे. यामध्ये भारतातील तब्बल ४३ अ‍ॅप्सना ब्लॉक करण्यात आले आहे. आयटी अ‍ॅक्ट ६० ए अंतर्गत सर्व ४३ अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षेसाठी धोका असल्याचे कारण देत या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आल्याचे कारण सरकारकडून देण्यात आले आहे.

आयटी कायद्याच्या कलम ६९ ए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. बंदी घातलेले सर्व अ‍ॅप्स भारताच्या सार्वभौमत्व, अखंडता, संरक्षण, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

सरकारने ज्या अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे त्यात अली सप्लायर्स मोबाईल अ‍ॅप, अलिबाबा वर्कबेंच, अली एक्सप्रेस, अलिपा कॅशिअर, लालामूव इंडिया, ड्राईव्ह विथ लालामोव इंडिया, स्नॅक व्हिडिओ, कॅमकार्ड-बिझिनेस कार्ड रीडर, कॅम कार्ड- बीसीआर वेस्टर्न, साऊल, चायनजी सोशल, आशियन डेट, फ्लर्ट विश, गायज ओनली डेटिंग, टूबिट, वी वर्क चायना, फर्स्ट लव लाईव्ह, रिला, कॅशिअर वॉलेट, मँगो टीव्ही, एमजीटीव्ही, वी टीव्ही, वीटीव्ही लाइट, लकी लाईव्ह, टाओबाओ लाईव्ह, डिंग टॉक, आईडेंटिटी वी, आयसोलँड 2, बॉक्स स्टार, हॅपी फिश, जेलीपॉप मॅच, मंचकिन मॅच, कॉनक्विस्टा ऑनलाइन या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी