30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रAmit Shah : गृहमंत्री अमित शाह म्हणाले, 'ममता दीदी, ही तर सुरूवात,...

Amit Shah : गृहमंत्री अमित शाह म्हणाले, ‘ममता दीदी, ही तर सुरूवात, निवडणुकीपर्यंत एकट्याच राहाल’

टिम लय भारी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या दौ-यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस व सीएएममधील ११ आमदारांनी व एका माजी खासदाराने भाजपात प्रवेश केला. यात तापसी मोंडल, अशोक दिंडा, सुदीप मुखर्जी, सायकत पंजा, शिलभद्र दत्ता, दिपाली बिश्वास, सुक्र मुंडा, श्यामपदा मुखर्जी, विश्वजीत कुंडू आणि बन्सारी मैती यांचा समावेश आहे. प. बंगालमध्ये विधानसभेचे निकाल लागतील तेव्हा भाजपा २०० च्या बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. आज ममता बॅनर्जी यांच्या सरकारला जोरदार धक्के देण्यात आले आहेत. आजी माजी खासदारांसह ११ आमदारांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत शहांच्या उपस्थितीच भाजपात प्रवेश केला आहे. या महाभरतीनंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्र् सोडले.

ममता आता एकट्याच राहतील…. भाजपा नेते अमित शहा

आज सर्व पक्षांतील चांगले लोक भाजपात दाखल झाले आहेत. आज एक माजी खासदार आणि तृणमूल काँग्रेसमधील आमदार भाजपामध्ये आले आहेत. ही तर सुरूवात झाली आहे. निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच राहाल. शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीएमचे चांगले लोक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी पक्षात आले आहेत. ममता दीदी म्हणतात, भाजपा लोकांना करायला लावते. दीदींना मी आठवण करून देऊ इच्छितो की, जेव्हा तुम्ही काँग्रेस सोडून तृणमूल पक्ष बनवला, ते पक्षांतर नव्हते का? जेव्हा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागतील, तेव्हा २०० पेक्षा अधिक जागा जिंकून भाजपा सत्तेत आलेली असेल. तुम्ही तीन दशकं काँग्रेसला दिली. २७ वर्ष कम्युनिस्टांना दिलीत. १० वर्ष ममता दीदींना दिलीत. भारतीय जनता पक्षाला पाच वर्ष द्या. आम्ही बंगालला सोन्यासारखं बनवू. ममता सांगतात की भाजपा सर्व पक्षांतून नेत्यांची आयात करते. मात्र, त्यांना लक्षात आणून देवू इच्छितो की त्यांचा मूळ पक्ष हा काँग्रेसचा होता. ही तर साधी लाट आहे. मी ज्या प्रकारची त्सुनामी पाहतोय, याची ममता यांनी कल्पनाही केली नसेल. ममता आता एकट्याच राहतील. जे लोक भाजपात येत आहेत ते लोक माँ-माटी-मानुषच्या ना-यासोबत पुढे आले होते. आज त्या लोकांचा मोहभंग झाला आहे. मोदींनी गरीबांसाठी जे अन्नधान्य पाठविलेले ते तृणमूल काँग्रेसने फस्त केले. भाजपाध्यक्षांच्या ताफ्यावर मोठमोठे दगड फेकले गेले, आम्ही यामुळे घाबरणारे नाही. प. बंगालच्या लोकांनी आता सत्तांतराचे मन बनविले आहे.

केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पश्चिम बंगालच्या दौ-यावर आहेत. अमित शाह यांच्या दौ-यादरम्यान भाजपाने तृणमूल काँग्रेसविरोधात एल्गार पुकारला. शाह यांच्या उपस्थितीत तृणमूलमधून बाहेर पडलेल्या सुवेंदू अधिकारी यांच्यासह ११ आमदार व एका माजी खासदाराने कमळ हाती घेतले. मिदनापूर येथे झालेल्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी