33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्री एकनाथ शिंदेंचा दणका, महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई होणार

मंत्री एकनाथ शिंदेंचा दणका, महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई होणार

टीम लय भारी

पाचगणी : महाबळेश्वर नगरपालिकेच्या तत्कालिन मुख्याधिकारी अमिता दगडे–पाटील यांनी अंधाधूंद कारभार केला होता. आपल्याच कर्माची फळे भोगण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे (Action will be taken against the chief minister of Mahabaleshwar municipality).

दगडे–पाटील यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लागला आहे. दगडे – पाटील यांनी केलेल्या घोटाळ्यांचे पुरावे पाठवून देण्याबाबत नगरविकास विभागाने पत्र धाडले आहे.

चिपळूण शहर स्वच्छतेसाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Eknath Shinde : गुंठेवारीबद्दल मंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्वाच विधान, म्हणाले…

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व या खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे तसेच तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी स्वच्छता अभियानामधील करोडो रुपयांच्या टेंडरमध्ये घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे विभागीय आयुक्तांमार्फत अमित दगडे पाटील यांच्या या ‘कर्तबगारी’चा अहवाल सरकारकडे पाठविला होता. या अहवालाची गंभीर दखल नगरविकास विभागाने घेतली आहे (This report has been taken seriously by the Urban Development Department).

खाशाबा जाधव यांनी पदक जिंकलं ; पण यश साजरा करण्यासाठी कोणीही भारतीय उपस्थित नव्हते

Maharashtra CM Uddhav Thackeray to be at e-meet with Sonia Gandhi

नगरविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. अमिता दगडे पाटील यांची चौकशी करावी, त्यांनी केलेल्या घोटाळ्याचे पुरावे सादर करावेत, अशा आशयाची मागणी नगरविकास विभागाने केली आहे.

सातारा जिल्हा शिवसेना युवासेना उपाध्यक्ष सचिन वागदरे यांनी हा घोटाळा उघडकीस आणला आहे. प्रसिद्धीपत्रकाद्वारे वागदरे यांनी ही माहिती दिली आहे.

Action taken against the cm of Mahabaleshwar municipality
महाबळेश्वर नगरपालिका

अमिता दगडे पाटील यांनी स्वच्छता अभियानामधील करोडो रुपयांच्या टेंडरमध्ये कोणत्याही कायदेशीर पद्धतीचा आवलंब केलेला नाही. नगराध्यक्षांच्या कार्यकर्त्यांना नियमबाह्य पद्धतीने कामे दिली आहेत.

कचरा डेपो, रंगरंगोटी, घंटागाडी खरेदी, डस्टबीन खरेदी, लेन्स कॅमेरा खरेदी, जाहिरातबाजी यांत घोटाळा झाल्याचा वागदरे यांनी आरोप केला आहे. सोशल मीडिया जनजागृतीमध्ये अवास्तव आणि भरमसाठ बिलाची वाढ केली आहे. बोगस कर्मचारी दाखवून नगरपालिकेला चुना लावल्याची तक्रार वागदरेंनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी