धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भेट घेतली. भुजबळ फार्मवर भुजबळ आणि पडळकर यांच्यात बैठक झाली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी भुजबळ (Chhagan Bhujbal) साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद आहे असे सांगितले. गोपीचंद पडळकर म्हणाले की, काल नाशिकमध्ये धनगर समाजाचा कौटुंबिक स्नेह मेळावा होता. या मेळाव्याच्या निमित्ताने मी नाशिकमध्ये आलो होतो. आज महायुतीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भेट घेतली.(Dhangar community leader Gopichand Padalkar meets Chhagan Bhujbal)
भेटीचे विशेष कारण नाही कारण ते आमचे नेते आहे. नाशिकमध्ये आल्यानंतर भुजबळ साहेबांना भेटलं पाहिजे या निरपेक्ष भावनेने मी त्यांना भेटलो. महायुती लोकसभा निवडणूक ताकतीने लढते आहे. महायुतीतील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते भुजबळ साहेब आहे त्यामुळे अनेक नेते त्यांना भेटतात. मी कार्यकर्ता आहे. भुजबळ साहेबांसोबत चळवळीत आहे. त्यामुळे माझी भेट वेगळी आणि वरिष्ठ नेते भेटतात ती वेगळी भेट असते, असे त्यांनी सांगितले.
भुजबळ फार्म बनले राजकारणाचे मुख्य केंद्र
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राजकीय नेतेमंडळी भुजबळ(Chhagan Bhujbal) फार्मवर येत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे, धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुभाष भामरे, दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यानंतर रविवारी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी भुजबळांची भेट घेतल्याने भुजबळ फार्म हे राजकारणाचे मुख्य केंद्र बनले असल्याचे दिसून येत आहे.