26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्र"कोणी उद्रेक शब्दही काढू नका", संभाजीराजेंची मराठा समाजाला विनंती

“कोणी उद्रेक शब्दही काढू नका”, संभाजीराजेंची मराठा समाजाला विनंती

टीम लय भारी

मुंबई :-  राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी नाराजी जाहीर केली आहे. “कोणी उद्रेक शब्दही काढू नका”, संभाजीराजेंची मराठा समाजाला विनंती केली आहे (“Don’t utter a word of outburst”, Sambhaji Raje has appealed to the Maratha community).

सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावताना मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय आणि मागास आयोगाचा रिपोर्ट याच्यातून आम्हाला मराठा आरक्षण देणे गरजेचे आहे हे स्पष्ट होत नसल्याचे सांगितले. तसेच इंद्रा सहानी खटल्याबाबत पुन्हा एकदा तपासणी करण्याची गरज वाटत नसल्याचा उल्लेख करत मराठा आरक्षण रद्द करत असल्याचा निर्णय दिला. संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत बोलताना समाजाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे (Speaking at the press conference, Sambhaji Raje said that it is very unfortunate from the point of view of the society).

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द

रोहित पवारांची भीती अखेर खरी ठरली, हे ट्विट आलं चर्चेत

Why the Maratha quota case in Supreme Court is about more than just the 50% limit to reservations

“बहुजन समाजाला आरक्षण मिळावे अशी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका होती. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा (Maratha community) समावेश होता. गरीब मराठ्यांसाठीच माझा हा लढा होता. बहुजन समाजात समावेश करुन घेतले तर जातीय मतभेद ते कमी होतील, विषमता कमी होईल असा माझा प्रयत्न होता. पण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असून तो मान्य करावा लागतो. पण समाजाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे,” अशी खंत संभाजीराजेंनी व्यक्त केली आहे (It is very unfortunate from the point of view of the society, ”lamented Sambhaji Raje).

“आधीच्या सरकारनेही जोमाने बाजू मांडून हायकोर्टाच्या माध्यमातून पारित झाले होते. या सरकारनेही जोमाने बाजू मांडली. केंद्र सरकारलाही यामध्ये आणले होते. जे शक्य होईल ते सर्व दोन्ही सरकारने केले होते. पण सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आपण जास्त काही बोलू शकत नाही,” असे संभाजीराजेंनी म्हटले (We can’t say much about the Supreme Court verdict, “said Sambhaji Raje). कोणी कमी पडले असे मी म्हणणार नाही. सर्वांनी आपली बाजू चांगली मांडली आहे असे ही यावेळी त्यांनी सांगितले.

“उद्रेक होऊ नये या मताचा मी आहे. करोनाची महामारी सुरु असताना, माणसे मरत आहेत. सध्या आपली माणसे जगली पाहिजेत याकडे लक्ष दिले पाहिजे. कोणी उद्रेक शब्दही काढू नका,” अशी विनंती संभाजीराजेंनी मराठा समाजाला केली आहे (Don’t utter any outrageous words, Sambhaji Raje has requested the Maratha community). “बाकीच्या राज्यातील लोकांना ५० टक्के आरक्षण देत असताना महाराष्ट्राला वेगळा निर्णय का याचे वाईट वाटते,” अशी खंत संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) व्यक्त केली.

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी