33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीयभाजपाचे संजय राऊतांना आव्हान !

भाजपाचे संजय राऊतांना आव्हान !

टीम लय भारी

मुंबई : मनोहर पर्रिकरांच्या मुलाच्या भाजपकडून तिकिट देण्याच्या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी विरोधकांचा दबाव भाजपवर असल्याचे वक्तव्य केले होते. उत्पल पर्रिकरांच्या तिकिटाबाबाबत भाजपचा दिल्लीत विचार सुरू आहे, असाही गौप्यस्फोट त्यांनी केला. राऊतांच्या या दाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी पर्रिकरांच्या निवडणूक लढवण्याच्या मुद्दयावरून थेट संजय राऊतांनाच आव्हान दिले आहे. चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते(BJP’s open challenge, Sanjay Raut should fight from Goa).

संजय राऊत जगभरातील विद्वान आहेत. त्यांनी गोव्यात विधानसभा मतदारसंघात मनोहर पर्रिकरांच्या मुलाला तिकिट देण्याचे म्हटले आहे. अपक्ष निवडणूक लढवावी, असे त्यांनी सांगितले आहे. तुमच कोण एेकायला बसले आहे ? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला. हिंमत आहे तर गोव्यातील एक मतदारसंघ लढवावा, असे थेट आव्हान चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना दिले आहे(Sanjay Raut has said to give ticket to Manohar Parrikar’s son in the assembly constituency).

मोदीजी गुजरातमधून लढतात आणि उत्तर प्रदेशातूनही लढतात. तुम्हीही लढा. नुसती भाषण करण्यापेक्षा तुम्ही लढा. पर्रिकराच्या मुलाला तिकिट दिले, तर इतर पक्ष पर्रिकरांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही आणि ही निवडणूक बिनविरोध होईल, हेदेखील सांगावे असे आव्हान चंद्रकांत पाटलांनी दिले आहे.

हे सुद्धा वाचा

BJP : भाजपाचा राज्य सरकारवर ‘निशाणा’, ‘गोरगरीब जनता इथे उपाशी, बिल्डरांना मात्र मणीहार…’

संजय राऊत सातत्याने माझ्यावर टीका करून मला प्रसिद्धी मिळवून देतात : चंद्रकांत पाटील

Maharashtra CM should delegate powers of attending meetings, visiting places to someone: BJP

उत्तर प्रदेश निवडणुकीत कोण मतदान करणार आहे, ते मतदानानंतर कळेल. त्यामुळे प्रेत मतदान करणार की, प्रत्यक्ष लोक मतदान करणार हे निकाल आल्यावरच स्पष्ट होईल. महाराष्ट्रात एकेका चितेवर २४ प्रेते जाळली, याचीही आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

मेट्रो कंपनी ही प्रशासनासाठी काम करते की राजकीय नेत्यांना श्रेय देण्यासाठी ? आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार म्हणजे पवार साहेबांचा मेट्रो प्रकल्पाचा दौरा होय, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. पवारांच्या उपस्थितीत मेट्रो चाचणीच्या मुद्दयाला चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला. मेट्रो कंपनीच्या अशा कारभाराविरोधात हक्कभंग आणणार असल्याचेही ते म्हणाले. आमदार, खासदार आणि महापौरांना न बोलावता चाचणी केल्यासाठी हक्कभंग आणणार असल्याचे ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी