30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयसंजय राऊत सातत्याने माझ्यावर टीका करून मला प्रसिद्धी मिळवून देतात : चंद्रकांत...

संजय राऊत सातत्याने माझ्यावर टीका करून मला प्रसिद्धी मिळवून देतात : चंद्रकांत पाटील

टीम लय भारी

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर मिश्किल टीका केली आहे. संजय राऊत माझ्यावर सतत टीका करून मला भरपूर प्रसिद्धी मिळवून देत आहे. असे विधान पाटील यांनी केले आहे (Chandrakant Patil’s mischievous criticism on Sanjay Raut).

राजकरणात कुप्रसिद्धीचाही उपयोग असतो, परंतु ती टीका फक्त योग्य ठिकाणांहून व्हावी लागते. सज्जन माणसांनी टीका केली की धोका असतो परंतु, राऊतांसारख्यांच्या टीकेचा फायदाच होतो. असे म्हणत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांना दुर्जन म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून राऊतांवर टीका केली आहे.

Sanjay Raut : तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा

Sanjay Raut : ईडीचा नवा खुलासा:प्रवीण राउत-संजय राउत यांच्या पत्नी पार्टनर! वर्षा राउत यांना 55 लाखांचे बिनव्याजी कर्जही दिले, ED चा गंभीर आरोप

चंद्रकांत पाटील यांनी पीएमसी बँक घोटाळ्यात राऊतांचा हात असल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी आपण असले धंदे करत नाही, असले घोटाळे केले असते तर मी इतक्या वर्षात राजकारणात राहिलो नसतो. असे म्हणत राऊत यांनी आपण पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा ठोकणार असून त्यांची तेवढीच किंमत आहे. असे विधान करत राऊतांनी पाटलांवर टीका केली होती.

MNS questions to Sanjay Raut : अग्रलेख लिहिण्यापलीकडे काय केलंत? मनसेचा संजय राऊतांना सवाल

BJP raking up ‘outsider’ card with eye on UP Assembly, Mumbai civic polls: Sanjay Raut

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी