31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeक्रिकेटबीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया...

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी - एन सी ए - च्या राष्ट्रीय पातळीवरील इंटर एन सी ए स्पर्धेसाठी इंडिया बी संघात निवड झाली आहे.

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील इंटर एन सी ए स्पर्धेसाठी इंडिया बी (India B) संघात निवड झाली आहे.(Sahil Parakh named in India B squad for BCCI, Inter-NBA tournament)

साहिल पारेख (Sahil Parakh) सध्या २६ एप्रिल ते २२ मे दरम्यान, माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , युवा खेळाडूंसाठी होत असलेल्या शिबिरात नाडियाद येथे सहभागी झाला आहे .

२९ मे ते ९ जुन दरम्यान अहमदाबाद येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील इंटर एन सी ए स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट (Cricket) असोसिएशनच्या साहिलची  निवड झाली आहे. त्याबरोबर किरण चोरमाळे, अनुराग कवडे व योगेश चव्हाण हे इतर तीन खेळाडू देखील निवडले गेले आहेत .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी