33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeजागतिकब्रिटनमध्ये पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ‘ऋषी सुनक‘ आघाडीवर

ब्रिटनमध्ये पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ‘ऋषी सुनक‘ आघाडीवर

टीम लय भारी

लंडन: ब्रिटनमध्ये पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक आघाडीवर आहेत. तसेच लिस ट्रस, जेरेमी हंट,नदीम जाहवी, पेनी माॅर्डेट, ब्रेन वाॅलेस हे देखील पंतप्रधान पदासाठी उत्सुक आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन सरकार कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहे. ते कंजर्वेटिव्ह पार्टीचे आहेत. ते लवकरच पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत. राजीनामा देण्यापूर्वी ते देशाला संबोधीत करतील.

30 जूनला ‘डेप्युटी चीफ व्हिप‘ पदासाठी क्रिस पिंचर यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी पिंचर सेक्स स्कॅंडलमध्ये फसले आहेत, तरी देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे बोरिस जाॅन्सन यांचे संपूर्ण मंत्री मंडळ नाराज आहे. ब्रिटनच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्री राजीमाने देत आहेत. ही संख्या दिवसा गणीक वाढत आहे. त्यामुळे लवकरच जाॅन्सही राजीनामा देतील अशी परिस्थिती ब्रिटनमध्ये निर्माण झाली आहे. पिंचर यांची नियुक्ती आणि जाॅन्सन यांच्या काम करण्याच्या पध्दतीवर 50 आमदार आणि खासदार नाराज आहेत. त्यांचा जाॅन्सन यांच्यावर अविश्वास निर्माण झाला.

लेबर पार्टीचे विरोधी पक्ष नेता कीर स्टारर म्हणाले की, बोरिस जाॅन्सन यांनी अगोदरच हे पद सोडायला हवे होते. त्यांनी राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय हा देशहिताचा आहे. जाॅन्सन यांच्या कार्याकाळात तब्बल 12 वर्ष देशाचे खूप नुकसान झाले. 12 महिन्यापूर्वी त्यांनी विश्वास दर्शक ठराव जिंकला होता. त्यामुळे आता 12 महिने तरी त्यांच्या खूर्ची धोका नाही. त्यामुळे बोरिस जाॅन्सन यांनी स्वतः या पदाचा राजीनामा दिला तरच यातून मार्ग निघू शकतो. जाॅन्सन यांना फेरनिवडणूका नको आहेत. तरी देखील त्यांना निवडणूकीला समोरे जावे लागू शकते.

हे सुध्दा वाचा:

जयपूरमध्ये ‘द्रौपदी मुर्मू‘ यांची भव्य रॅली

सुप्रिया सुळे वेबसाईटवरुन साधणार जनसंवाद

‘भ्रष्टाचाराचे खड्डे उघडे पडले’, आशिष शेलार यांची महापालिकेच्या कर्त्याधर्त्यांवर टीका

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी