29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeआरोग्यCovid-19 : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्याच्या सीमा सीलबंद करणार : राजेश टोपे

Covid-19 : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्याच्या सीमा सीलबंद करणार : राजेश टोपे

Covid-19 : अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व कर्मचाऱ्यांना पासेस देणार

टीम लय भारी

मुंबई : अन्य राज्यातील प्रवाशी महाराष्ट्रात येऊ नयेत म्हणून राज्याच्या सीमा बंद करण्यात येणार आहेत. तूर्त हा निर्णय गोव्याच्या सीमेबाबत घेण्यात आला आहे. त्यात आणखी वाढ केली जाऊ शकते असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

टोपे पुढे म्हणाले की, जनता कर्फ्यूच्या अनुषंगाने उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली होती. ही संचारबंदी त्यापुढेही वाढविली जाणार असून ३१ मार्चपर्यंत लागू राहील. राज्यात लागू केलेल्या ‘लॉक डाऊन’मधून काही संस्था वगळल्या आहेत. यांत बँकिंग, आर्थिक सेवा, आरोग्य, खाद्यान्न सेवा, विमान क्षेत्र, रूग्णालये, प्रसारमाध्यमे, फोन, इंटरनेट सेवा, ऑईल व पेट्रोलियम, गोडाऊन, इन्फर्मेशन व तंत्रज्ञान, पाणी, वीज या अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत. या सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने – आण करण्यासाठी गाड्यांना स्टिकर लावले जातील. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना पासेस दिले जातील. स्टिकर असलेली वाहने व पासेस असलेल्या लोकांनाच प्रवास करता येईल. आता ५ टक्क्यांपर्यंत लोक सरकारी कार्यालयात येतील. त्यांनाही पासेस दिले जातील. अतिशय जड अंतःकरणाने घ्यावा लागलेला हा निर्णय आहे. लोकांचे आरोग्य व जनहितामुळे असे निर्णय घ्यावे लागतात. त्याचा गैरफायदा कुणी घेऊ नये. कुणी काळाबाजार करू नये. साठेबाजी करू नये. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये महात्मा गांधींनी ज्या घोषणा केल्या होत्या, त्याचे पालन देशातील जनतेने केले होते. अशा सुचनांचे पालन लोकांनी करण्याची आता वेळ आली आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःवर नियंत्रण घालायला हवे. कोरोनाला लगाम घालण्यासाठी स्वयंशिस्तीत राहावे. रूग्णांची संख्या वाढू नये. त्यांचा गुणाकार होऊ नये. अन्य देशांमध्ये तसे झाले आहे. तसे आपल्याकडे होऊ नये यासाठी लोकांनी स्वत:वर निर्बंध घालावेत.

लहान मुलांची, वयोवृद्धांची काळजी घ्या. त्यांना घरात अधिक सुरक्षित ठेवा. संशयित लोक आहेत. महाराष्ट्रात ७४ लोक पॉझिटिव्ह आहेत. संशयित व पॉझिटिव्ह लोकांचे मनोबल वाढविण्याचे काम करायचे आहे. डॉक्टरांचे मनोबल वाढवायला हवे, असे आवाहनही टोपे यांनी केले.

एका रूग्णाचा मृत्यू आज झाला. त्यांना भरती केले होते, तेव्हा त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आढळली होती. त्यांना डायबेटीस होता. मानसिक आजार होता. हृदयविकाराचा त्रास होता. त्यांचे वय ६३ वर्षे होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला इतरही आजार कारणीभूत होते.

आज नवीन दहाजण ‘कोरोणा’ग्रस्त आढळून आले आहेत. त्यापैकी ६ संपर्कातून आलेले आहेत. ५ जण परदेशातून आलेले आहेत. संपर्कातूनही रूग्ण वाढताहेत पण त्याचे प्रमाण कमी आहे. रक्तदानाची गरज आहे. थोड्या संख्येने ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्थांनी रक्त जमा करण्याची गरज आहे. मुख्य सचिव व मुख्यमंत्र्यांशी बोलून रक्ताची साठवणूक करण्याची मी विनंती करणार आहे. त्यासाठी छोटे ब्लड कॅम्प घ्यावे लागतील. तशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांना द्याव्या लागतील.

राज्यात आतापर्यंत १८७६ रूग्णांची तपासणी केली आहे. त्यापैकी १५९२ निगेटिव्ह आले आहेत. पण ७४ पॉझिटिव्ह आले आहेत. २९६ चाचण्यांचे अहवाल अजून आले नाहीत. बाहेरून येणारी विमान वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. आज सकाळी लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये दोन होम कोरोन्टाईन केलेल्या व्यक्ती होत्या. त्यांना मनमाडला स्वतंत्र गाडी करून पाठविले. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी होम कॉरन्टाईन केलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवायचे आहे. नातेवाईकांनी आणि सामाजिक संघटनांनी सुद्धा ते इतरत्र येणार नाहीत याची काळजी घ्यावी. बाहेरच्या राज्यातील लोकांना सुद्धा विशेष वाहनांने त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पाठविण्याची सोय केलेली आहे.

कलम १४४ हे नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका या क्षेत्रासाठी आहे. त्यामुळे राज्यातील नागरी भागात हे लॉकडाऊन झाले आहे. ‘कोरोना’चा रूग्ण आढळल्यानंतर ३० दिवसांत त्याचा गुणाकार होत जातो, असे इतर देशांतील प्रकरणांवरून लक्षात येत आहे. पण ‘पुढच्याला ठेच, मागचा शहाणा’ यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सहकारी मंत्र्यांनी ‘लॉकडाऊन’चा योग्य निर्णय घेतला असल्याचे टोपे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Lockdown : मध्यरात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्र बंद, रेल्वेही बंद : उद्धव ठाकरे यांची घोषणा

Coronavirus : ‘चलता है’ वृत्तीने नुकसान होईल : विश्वास नांगरे पाटील

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी