30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीयजयंत पाटलांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेची उडवली खिल्ली

जयंत पाटलांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेची उडवली खिल्ली

टीम लय भारी

मुंबई: भाजपने सुरु केलेल्या जनआशिर्वाद यात्रेची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. देशात कधी केंद्रीय मंत्री झाले नाहीत का? की केंद्रीय मंत्री कोणी कधी पाहिले नाहीत. ही जनआशिर्वाद यात्रा हास्यास्पद आहे, असे जयंत पाटील म्हणाले आहेत (Jayant Patil mocked BJP Jan Ashirwad Yatra).

जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध करतानाच भाजपलाही काही सवाल केले. जनआशिर्वाद यात्रा कशासाठी? पेट्रोल – डिझेलच्या आणि घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून की, महाराष्ट्रात व देशात महागाई वाढवली म्हणून? जनतेने यांना आशिर्वाद कशासाठी द्यायचा? असे सवाल जयंत पाटील यांनी भाजपला केला आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांचे मानले आभार

शरद पवारांच्या मागोमाग जयंत पाटीलांनीही घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेले वक्तव्य चुकीचे आहे. अशी भाषा महाराष्ट्रात कधीच कुणी वापरली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा मंत्र्याला कशाच्या आधारे मंत्रिमंडळात घेतले? असा सवाल करतानाच राणेंच्या वक्तव्याला तुम्ही समर्थन करत आहात काय?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे (Jayant Patil to Chandrakant Patil and Leader of Opposition Devendra Fadnavis).

Jayant Patil mocked BJP Jan Ashirwad Yatra
अशी भाषा महाराष्ट्रात कधीच कुणी वापरली नव्हती

नारायण राणे यांच वक्तव्य निषेधार्थ आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल ही भाषा वापरणे चुकीचे आहे. राजकारणाचा स्तर खाली गेला आहे, असे नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेला आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

नारायण राणेंना उद्धव ठाकरेंचा झटका

Maharashtra minister Jayant Patil rushed to hospital after complaining of restlessness during cabinet meet

महाराष्ट्रात शिवसेनेने जबाबदारीने वागायचे काम केले आहे. कायदा कोणाला हाती घेऊ देणार नाही. राष्ट्रवादी याचे समर्थन करणार नाही. गृहखात्याला याबाबत जास्त माहिती आहे. विधानाकडे बघितले तर परिस्थिती समजू शकतो, असे जयंत पाटील म्हणाले.

मोदींचे वक्तव्य समजावे लागेल

राणेंनी केलेले वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य समजावे लागेल. कारण मोदींनीच त्यांना मंत्री केले आहे. त्यामुळे राणेंच्या वक्तव्याचे फडणवीस आणि पाटील समर्थन करत आहेत का? असा माझा सवाल आहे. फडणवीस आणि पाटील यांनी भूमिका स्पष्ट करावी. नाही तर देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या मागे भाजप लागल्याचे चित्रं देशात जाईल, असे जयंत पाटील म्हणाले (Jayant Patil following BJP behind the Chief Minister will go to the country).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी