30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्र“भारत न्युझीलंड कानपूर कसोटी क्रिकेट अध्याय” (भाग २)

“भारत न्युझीलंड कानपूर कसोटी क्रिकेट अध्याय” (भाग २)

अभय गोवेकर, टीम लय भारीचे अधिकृत क्रिकेट तज्ञ

न्युझीलंडच्या आघाडीच्या जोडीने दिडशे धावांची भागीदारी करुन डावाचा पाया रचला. लॅथमचे शतक पांच धावानी हुकले तर यंगचे ११ धावांची यानंतर येणाऱ्या कर्णधार विल्यमसन १८, जेमीसन २३ या दोघांनाच दोन आकडी संख्या गाठता आली. भारताप्रमाणेच यांचीही मधली फळी कोळसली व १४२.३ चेंडूत २९६ या धाव संख्येवर सर्व संघ बाद झाला. भारताने १६ धावांचे अवांतर योगदान न्युझीलंडला भेट स्वरुपी दिले. गेली अनेक वर्षे मुख्य-प्रमुख प्रशिक्षकासोबत सहाय्यक म्हणून अनेकांची खास नेमणूक करुन संघासोबत दौऱ्यावर पाठविले जाते. सरावा दरम्यान ते गोलांदाजांसोबत असतात. परंतु नो बॉल न टाकण्याचे तंत्र प्रशिक्षक स्वत: किंवा सहाय्य्क यांना विकसित करता आलेले नाही. नियंत्रण-ताबा मिळवणे अद्यापही शक्य झालेले नाही(Abhay Govekar, India VS  New Zealand Kanpur Test Cricket Chapter).

राष्ट्रीय क्रिकेट संस्था-अकॅडमीमध्ये खास किमान १०० कसोटी खेळलेल्या गोलंदाजाची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. दशावतारातील सोंगांची कामे करणाऱ्या कलाकारासोबत आपल्या निवड समिती सदस्यांनाही आमंत्रीत करावे. ‘वाईड‘ चेंडू गोलंदाजाकडून टाकला जाणार नाही याची दक्षता घेण्यासंबंधी व जालीम उपायाबद्दल त्यांच्याकडून काही सूचना – मार्गदर्शन होवू शकेल. सोबत त्यांचा खेळाचा अभ्यास – गृहपाठ व बौध्दीक ज्ञानाचा उलघडाही होईल. आपल्याकडे कसोटी क्रिकेटची साधी खेळपट्टी न पाहिलेली व्यक्ती निवड समिती सदस्य होवू शकते व नाममात्र दीड कसोटी खेळलेला शंभर कसोटी खेळणाऱ्याची निवड करतो असे आमचे विकसित क्रिकेट आहे.

“भारत न्युझीलंड कानपूर कसोटी क्रिकेट अध्याय”

क्रिकेट : छोडो कलकी बातें कलकी बात पुरानी ! (अभय गोवेकर)

खेळपट्टी नक्कीच फिरकीस अनुकूल राहणार हे अपेक्षितच होते. त्यानुसार आश्विनला ८२ धावातील ३ बळी मिळाले. जाडेजास ५७ धावात १ बळी तर अक्षर पटेलने ६२ धावात ५ बळी घेऊन आपलीच चुणूक दाखवली व न्युझीलंड संघावर ५९ धावांचा लीड घेऊन दिला. १०० धावात संघ सर्वबाद झाला. आपल्या पहिल्या डावांसारखेच चित्र होते. भारताने आपल्या दुसऱ्या डावाचा आरंभ केला. ५ षटकांचा खेळ झाला. त्यात आघाडीचा फलंदाज गिल बाद झाला व धावसंख्या १ बाद १४ अशी होती. पुजारा ९ धावांवर खेळत आहे, तर अगरवाल ४ धावांसहित त्यास साथ देत आहे.

आज भारतीय संघातून दोन डावखूरे फिरकी गोलंदाज मैदानात उतरले आहेत. एक अनुभवी तर दुसरा नवशिक्या परंतु आजचा दिवस त्याने गाजविला. चार कसोटी सामन्यानंतरच्या अनुभवाने आज त्याला ५ बळी घेणे शक्य झाले आहे. एका कॅलेंडर वर्षात प्रथमच त्याने केले. परंतु यापुर्वी त्याने १९५२ मध्ये विनू मांकड तसेच १९९४ मध्ये व्यंकटपती राजूने अशीच कामगिरी केलेली आहे.

न्युझीलंडच्या शेन बॉंडने १२ कसोटीत ५० बळी मिळवले होते. त्याच प्रकारात आज जेमिसननेही हा पल्ला गाठला तोही ९ व्या कसोटीत .

अक्षर पटेलने आज गोलंदाजी करताना आपल्या मर्यादा ओळखून मधल्या तसेच उजव्या यष्टीवर मारा केला. क्रीझचा योग्य वापर केला. फलंदाजांना मोहात पाडले, द्विधा मनस्थितीत गाठले. चुका करण्यास भाग पाडून त्यांना बाद करण्यात यश मिळविले. त्याला दुसऱ्या बाजूने आश्विन जडेजाची अपेक्षित साथही लाभली. खेळपट्टीचा अभ्यास करुन गोलंदाजी केली. चौथ्या डावात शेवटची फलंदाजी न्युझीलंड संघासच करावयाची असल्याने आश्विनने ‘राऊंड द विकेट’ मारा करुन तो खेळपट्टीच्या डेंजर झोनमध्ये जात होता. याची दखल घेऊन पंचांनी आश्विनला प्रथम ताकीद दिली व कर्णधार रहाणेच्या नजरेसही आणले. आज ६३ धावांची आघाडी भारताकडे आहे ती वाढवून यात दीडशे-दोनशे धावांची भर टाकून २७०/७५ पर्यंत नेली तर न्युझीलंडला सामना वाचवणे कठीण होऊ शकते.

३७ वर्षीय वृद्धीमान साहा, आज त्याच्या मानेच्या दुखण्यामुळे मैदानावर येऊ शकला नाही तेव्हा त्याच्या जागी राखीव २८ वर्षीय आंध्रप्रदेशचा यष्टीरक्षक श्रीकर भरतला संधी दिली गेली. त्याचा फायदा घेत विल यंग – टेलर यांचे झेल घेतले. लॅथमला यष्टिचित केले. यष्टीरक्षण करणे किमान या अशा खेळपट्टीवर वाटते तेवढे सोपे नव्हते. आज २५.३ षटकांसाठी त्याने यष्टीरक्षण केले. सर्व भारतीय गोलंदाजांनी त्याचे कौतुक केले. साहावर वैद्यकीय उपचार चालू आहेत. साहाची दुखापत जुनीच आहे. धोनी नसताना त्याला संधी मिळत असे. आता पंतकडे आहे. साहाने फलंदाजीत पहिल्या डावात काही योगदान केलेले नाही. दुसऱ्या डावात येवू शकेल याची शाश्वती नाही. कदाचित तो मुंबई कसोटीत दिसू शकणार नाही. असा विचार अनेकांच्या मनात आला असेल. तोच साहा फलंदाजीसाठी मैदानात उतरला व नाबाद ६१ धावांची खेळी केली तीही १२६ चेंडूत.

डेविड वॉर्नरला मिळालेल्या ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ किताबावर, शोएब अख्तरची नाराजी

Reunion of Virat Kohli and Rahul Dravid: Fire and ice as Indian cricket seeks new turn

कसोटी पदार्पणात पहिल्या डावात शतक व दुसऱ्या डावात अर्धशतक असा विक्रम करणारा श्रेयस अय्यर हा पहिलाच खेळाडू आहे. भारताची ५ बाद ५१ धावसंख्या असताना त्याने अश्विनसह ५२ धावांची भागीदारी केली. अश्विनने ३२ धावा करुन आपले अष्टपैलूत्वाचे प्रदर्शन घडविले. पुढे साहा बरोबर ६४ धावांची निर्णायक भागीदारी केली. श्रेयसने स्वत: १९४ चेंडूत १ षटकारासहीत ६५ धावा केल्या. अक्षर पटेलने ६७ चेंडूत २८ धावा केल्या व आढव्या विकेटसाठी ६७ धावांची निर्णायक भागीदारी केली. ८१ षटकांत भारताने २३४ धावसंख्या करुन ७ गडी गमावले होते. तसेच त्यांनी आपला डाव घोषित केला. न्युझीलंडच्या तेज जोडगोळीने ३ X ३ बळी घेतले. भारताने न्युझीलंडसमोर विजयासाठी २८४ धावांचे लक्ष ठेवले. त्यांनी आपला दुसरा डाव सुरु केला व खेळ संपतांना चार षटकांत १ बाद ४ अशी त्यांची धावसंख्या होती. आघाडीचा यंग बाद झाला. आता सोमर विल बद्दल व लॅथम ही नाबाद जोडी खेळत आहे. आजच्या दिवसाचा खेळ दोघांसाठीही निर्णायक ठरेल.

भारतात आतापर्यंत कसोटी चौथ्या डावात २७६ धावा करुन सामना जिंकणारा वेस्टइंडीजचा एकमेव संघ होता. व्हिव्हियन रिर्चडस् व वेंगसरकर १९८७ साली दिल्ली कसोटीत एकमेकांविरुध्द ठाकले होते. कानपूर मध्ये विंडीज समोर १९५८ मघ्ये आपण २४० धावसंख्या केली होती. तरी २०३ धावांनी हरलो. कपिलदेव ४३४,

अनिल कुंबळे ६१९, हरभजनसिंग ४१७, आज आश्विनने ही बरोबरी साधली आहे. सुनील गावस्करने १९७१ साली विंडीज विरुध्द पोर्ट ऑफ स्पेन मधील सामन्यात दोन्ही डावात पन्नाशी गाठली होती. तर दिलावर हुसेनने १९३४ साली कलकत्ता येथे इंग्लड विरुध्दच्या सामन्यात दोन्ही डावात ५९ व ५७ अशा धावा केल्या होत्या. श्रेयस अय्यरने या सामन्यात एकंदरीत १७० धावा केल्या. त्याच्यापेक्षा जास्त १८७ शेखर धवनने मोहलीत ऑस्ट्रेलिया विरुध्द मार्च २०१३ मध्ये केल्या होत्या. तसेच १७७ धावा रोहीत शर्माच्या नावावर वेस्टइंडीज विरुध्द कोलकत्यातील सामन्यात नोव्हेंबर २०१३ मध्ये जमा आहेत. या सामन्यातील पंच विरेंदर शर्माने न्यूझीलंडचा आघाडीचा फलंदाज यंग याने पहिल्या डावात सुरेख फलंदाजीचे प्रदर्शन केले होते. त्याला दुसऱ्या डावात नाबाद असताना बाद ठरवून भारतास पहीला बळी मिळवून दिला. नेमणूक करणाऱ्या मंडळाच्या प्रतिनिधींनी हा केलेला विकास प्रगती की अधोगती ? देशाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणार का ?

शेवटच्या दिवशी लंचला न्युझीलंड ३ बाद १२५ अशी परिस्थिता होती. आजी-माजी कर्णधार खेळपट्टीवर होते. खेळपट्टीचे स्वरुप मंद होते. चेंडू बऱ्याच वेळी खाली राहत होता. जो राहीला त्याने फलंदाजास पायचित पकडून बाद ठरविले. खेळपट्टी पाचही दिवस टिकून राहिली म्हणून राहूल द्रविड खूश झाला व ३५,००० रुपये रोख त्याने खेळपट्टी करणाऱ्या माळ्यांना बक्षीस दिले व चाहत्यांची मने जिंकली.

जाडेजा अश्विनच्या फिरकीने भारतास विजयाची संधी जरूर आणून दिली. परंतु अपूरा प्रकाश व खेळपट्टीची कृपा यामुळे कसोटीत अनिर्णीत अवस्थेत संपली. नाईट बॉचमन सॉमर बॉइलने ११० चेंडू खेळून अनिर्णीत राखण्यासाठीचा पाया रचला संघ हरणार नाही याची काळजी घेतली. भारताच्या मध्यमगती गोलंदाजाचे सहकार्य-सहयोग कप्तानास लाभले नाही. न्यूझीलंड संघाने ९ बाद १६५ ही धावसंख्या उभारली. एवढ्याशा ही धावसंख्येत भारतीय संघाने १७ धावांची अवांतर भेट प्रतिस्पर्धी संघास दिली. हा चिंतेचा विषय आहे. कोचिंग स्टाफने यावर काम करणे महत्वाचे-गरजेचे आहे. सामनावीर अय्यरचे नाव घोषित करण्यात आले. रहाणेने शहाणेसारखी वाच्यता करण्याची नितांत गरज आहे. पंचांवर भाष्य करणे उचित नाही. स्वतःच्या फॉर्मची चिंता करावी. पुजाराचे काय? इशान शर्मास २२ षटकात एकही बळी घेता आला नाही. यावर विचार करावा यात भले आहे. द्रविडचा वशिला कायमस्वरूपी नाही. स्वतःस मैदानात सिध्द केल्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही.

आर आश्विनने मात्र हरभजनचा विक्रम मोडून स्वतः तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. आता दुसरी कसोटी ३ ते ७ डिसेंबर दरम्यान मुंबईत होईल. चिंतेचे गाठोडे घेऊन द्रविड प्रवासात निघणार आहे. मुंबई काय पदरात टाकणार हे वेळ-काळच ठरवेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी