30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयकाँग्रेस आमदार चंदक्रांत जाधव यांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची श्रद्धांजली.

काँग्रेस आमदार चंदक्रांत जाधव यांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची श्रद्धांजली.

टीम लय भारी

 मुंबई : विधिमंडळातील व काँग्रेस पक्षातील सहकारी कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी असून आपण एक कार्यतत्पर आणि मनमिळावू सहकारी गमावला आहे, अशा शोकभावना विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत(Balasaheb Thorat paid homage to Chandrakant Jadhav)

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनावर दुःख व्यक्त करून थोरात म्हणाले की, अत्यंत, शांत, संयमी, मनमिळावू स्वभाव असणारे चंद्रकांत जाधव कायम कोल्हापूरच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत होते.

युपीएच्या अस्तित्वावर सवाल उठवणाऱ्या ममता बॅनर्जींवर कॉंग्रेसचा पलटवार

मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती

कोरोनाच्या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली. त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली आणि त्यांची प्रकृती खालावत गेली.

उद्योगांच्या अनेक समस्या त्यांनी सरकारकडे पाठपुरावा करून सोडवल्या. कोल्हापूर शहराच्या विकासाबाबत ते कायम आग्रही होते. एक यशस्वी उद्योजक ते लोकप्रिय प्रतिनिधी असा त्यांचा प्रवास राहिला आहे.

खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ जया बच्चन यांनी वाटले चॉकलेट्स आणि पापड

‘Congress is the only viable alternative to protect democracy’: Maharashtra minister Balasaheb Thorat after Mamata Banerjee says ‘there is no UPA’

कोल्हापूरच्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक,  कला आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.

आमदार चंद्रकांत जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आम्ही जाधव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असे थोरात म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी