27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्रिकेटआशियाई क्रीडा स्पर्धा 2023 साठी भारतीय महिला संघाची घोषणा, जाणून घ्या कधी...

आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 साठी भारतीय महिला संघाची घोषणा, जाणून घ्या कधी आणि कुठे येणार पाहता

आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 भारतीय महिला व पुरुष क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली महिलांचा संघ पूर्ण ताकदीचा असणार आहे. महिलांचे सामने 19 सप्टेंबरला सुरु होतील आणि 28 सप्टेंबरला संपतील. हे सामने चीनमधील हांगझोऊ येथे होणार असून उपकर्णधार स्मृती मंधाना असेल. तर पुरुषांचा संघ दुसऱ्या क्रमांकाचा असेल, ज्यामध्ये ऋतुराज गायकवाड हा भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व करणार आहे. महिलांसाठी 14 सामने खेळवले जाणार असून 14 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

एशियन गेम्स 2023 हे स्टार स्पोर्टसवर लाइव्ह स्ट्रीम पाहायला मिळणार आहे. या दोन्ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळल्या जातील. भारतीय महिला क्रिकेट संघ बहु क्रीडा स्पर्धेत खेळण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतीय महिलांनी अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊन रौप्य पदक जिंकले होते.

हे सुध्दा वाचा:

धनंजय मुंडे यांची संवेदनशिलता; पाऊस लांबल्यामुळे कृषीमंत्रीपदाची जाण ठेवत वाढदिवस न साजरा करण्याची घोषणा

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, ऋतुराज गायकवाडच्या हाती कर्णधारपदाची धुरा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाशिकमध्ये स्वागत होताच आमदार सरोज अहिरे यांनी जाहीर केला पाठिंबा

भारतीय संघातील खेळाडू महिला

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दिप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकिपर), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तितस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा चेत्री (विकेटकिपर), अनुषा बरेड्डी

स्टँडबाय खेळाडू

हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक, पूजा वस्त्राकर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी