27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्रिकेटआशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, ऋतुराज गायकवाडच्या हाती कर्णधारपदाची धुरा

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, ऋतुराज गायकवाडच्या हाती कर्णधारपदाची धुरा

बीसीसीआयने आपल्या दुसऱ्या मोठ्या घोषणेमध्ये 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चीनमधील हांगझोऊ येथे जाणाऱ्या भारतीय क्रिकेट पुरुष खेळांडूची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्राचा फलंदाज ऋतुराज गायकवाड यांची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कर्णधारपद म्हणून निवड करण्यात आली आहे. या रोमांचक संघाचे नेतृत्व 26 वर्षीय गायकवाड करणार आहे. 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर यादरम्यान टी- 20 स्वरुपात स्पर्धा रंगणार आहेत. जितेश शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना भारतीय संघात प्रथमच बोलावण्यात आले आहे. रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांचा उल्लेखनीय समावेश आहे. दोन्ही खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या आयपीएल 2023 हंगामात प्रभावी कामगिरी केली आहे.

शिखर धवनला या संघात सर्वात उल्लेखनीय अनुपस्थिती आहे. नियमित नावांच्या अनुपस्थितीत धवनला संघाचे नेतृत्व करण्यासाठी परत बोलावले जाऊ शकते अशा बातम्या होत्या, परंतु त्याची निवड करण्यात आलेली नाही, कदाचित तो एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या योजनांमध्ये असावा असे सूचित करते. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी हे वरिष्ठ खेळाडू या सामन्यात खेळणार नाहीत. गेल्या काही वर्षांत देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना स्थान दिले आहे.

हे सुध्दा वाचा:

अजित पवारांचे अर्थमंत्रीपद रोखण्यासाठी शिंदेगट दिल्लीत – संजय राऊत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाशिकमध्ये स्वागत होताच आमदार सरोज अहिरे यांनी जाहीर केला पाठिंबा

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचा राहत्या घरी आढळला मृतदेह

भारतीय संघातील खेळाडू

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकिपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह (विकेटकिपर)

स्टँडबाय खेळाडू

यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, साई सुदर्शन ही स्टँडबाय खेळाडूंच्या यादीतील पाच नावे आहेत. मुख्य संघातील कोणत्याही खेळाडू दुखापत झाल्यास या खेळांडूना खेळायला मिळेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी