आयपीएलच्या धर्तीवर पुण्यात होत असलेल्या एमपीएल (महाराष्ट्र प्रीमिअर लीग) मध्ये राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांची एन्ट्री झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे पुण्यात एमपीएलचे सामने होत आहेत. एमपीएल स्पर्धेत मुंडे यांच्या वेंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने मराठवाड्याच्या छत्रपती संभाजी किंग्स संघाने या स्पर्धेत भाग घेतला आहे. छत्रपती संभाजी किंग्स संघाच्या 12 खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.
मराठवाड्यातील खेळाडूंना चांगली संधी मिळावी यासाठी मुंडे यांनी एमपीएलच्या लिलावात सहभागी होऊन मराठवाड्यातील जास्तीजास्त खेळाडू आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न केला आहे. या संघाचा आयकॉन प्लेयर असलेला धाराशिवचा राजवर्धन हंगरकेर हा वेगवान गोलंदाज असून, तो नुकत्याच संपलेल्या आयपीएल मध्ये धोनीच्या सीएसके संघाकडून खेळला आहे. त्याचबरोबर इंडिया अंडर नाइंटिन संघात विश्वचशक देखील खेळलेला आहे.
हे सुद्धा वाचा
बिपरजॉय चक्रीवादळाने घेतलं रौद रुप, रेड अलर्ट जारी
शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील बंगल्यातून मौल्यवान वस्तूंची चोरी
माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी माऊलींच्या वारीत दंग:टाळ मृदुंगाच्या तालावर धरला ठेका
याच संघात जालन्याचा वेगवान गोलंदाज रामेश्वर दौंड आणि ऑल राउंडर आकाश जाधव यांचाही समावेश आहे. धाराशिव जिल्ह्यातील डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहसीन सय्यद, संभाजी नगरचा डावखुरा स्पिनर ऋषीकेश नायर, नांदेड चा लेग स्पिनर स्वराज चव्हाण, रणजीपटू सामसुजा काझी, संभाजी नगरचा ट्वेन्टी ट्वेन्टी स्पेशालिस्ट आनंद ठेंगे, उजव्या हाताचा फलंदान स्वप्नील चव्हाण, बीडचा विकेट किपर बॅट्समन सौरभ नवले, धाराशिवचा मिडल ऑर्डर बॅट्समन अभिषेक पवार, ऋषीकेश दौंड या मराठवाड्यातल्या खेळाडूंचा समावेश आहे.