27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्रिकेटआयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर, भारत विरुद्ध पाकिस्तान या दिवशी...

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर, भारत विरुद्ध पाकिस्तान या दिवशी येणार आमनेसामने

भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये विश्व टेस्ट चैंपियनशिपचा शेवटचा सामना 11 जुन रोजी पार पडला. आत्ता क्रिकेट प्रेमींच लक्ष्य विश्वचषकाकडे लागले असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने यंदाच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023चे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हे लवकरच आमने-सामने येणार आहेत. येत्या 15 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबाद मधल्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम मध्ये पहायला मिळणार आहे. दहा देशांमध्ये खेळवले जाणारे सामने रंजक ठरणार आहेत, चौकार-षटकारांची आतिषबाजी आणि अनेक विक्रम या क्रिकेट मालिकेत पहायला मिळमार आहेत. या मालिकेतील भारताची पहिली मॅच ऑस्ट्रेलिया बरोबर होणार आहे. आयसीसी विश्वचषक 2023 चा पहिला सामना 5 ऑक्टोबर 2023 ला इंग्लड आणि न्युझीलंड मध्ये खेळला जाणार आहे व 19 नोव्हेंबर 2023 रोजी शेवटचा सामना पार पडणार आहे.

बीसीसीआयने आयसीसीला पाठवलेल्या अहवालानुसार भारत नऊ सामने खेळणार आहे. भारताची पहिला सामाना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 ऑक्टोबरला चेन्नई मध्ये होणार असून भारत क्वालिफायर च्या दोन मॅच 1 आणि 2 नोव्हेंबर ला मुंबई आणि बेंगळुरू येथे खेळणार आहे.,अफगाणिस्तान विरुद्ध दिल्ली (11 ऑक्टोबर ),पाकिस्तान विरुद्ध अहमदाबाद (15 ऑक्टोबर ), बांग्लादेश विरुद्ध (19 ऑक्टोबर ),न्यूजीलैंड(22 ऑक्टोबर),इंग्लंड (29 ऑक्टोबर), दक्षिण आफ्रिका (5 नोव्हेंबर). पाकिस्तानी टीम पाच मैदानावर सामने खेळु शकते.क्वालिफायर चे दोन सामने 6 आणि 12 ऑक्टोबरला अहमदाबाद व हैदराबाद येथे खेळणार आहे . बेंगळुरू मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 20 ऑक्टोबर रोजी,अफगाणिस्तान विरुद्ध 23 ऑक्टोबर आणि साऊथ आफ्रिका विरुद्ध 27 ऑक्टोबर ला चेन्नई येथे होईल. तसेच इंग्लंड सोबत 12 नोव्हेंबर ला पाकिस्तान चा सामाना पार पडेल. याच बरोबर न्यूजीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांचा सामना 29 ऑक्टोबर रोजी धर्मशाळा येथे होणार आहे.न्युझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा पुणे येथे 1 नोव्हेंबर तर ऑस्ट्रेलिया व इंग्लड 4 नोव्हेंबर ला अहमदाबाद येथे भिडणार आहेत.

हे सुध्दा वाचा:

सीईटीचा निकाल जाहीर, २८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल !

२० पोलिसांनी ४ वारकऱ्यांना एका खोलीत नेऊन बेदम मारले

सामन्यादरम्यान अजिंक्य आणि शार्दुलचे मराठीत संभाषण व्हायरल

 

ही मालिका दर चार वर्षांनी विविध ठिकाणी आयोजित केली जाते आणि या वर्षी भारताने आयसीसी विश्वचषक 2023 चे आयोजन केले आहे. या वर्षी या मालिकेत दहा संघ सहभागी होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारत, इंग्लड, न्युझीलंड, अफगानिस्तान, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे. सेमीफायनल आणि फायनल या सामन्यासह एकुण 48 सामने खेळवले जाणार आहेत. त्या आधी गुण मिळवण्यासाठी सर्व संघ क्वालिफायर सामन्यांमध्ये सहभागी होणार आहेत. विश्वचषक 2023 ट्रॉफी मिळवण्यासाठी सर्वाधिक गुण असलेले संघ स्पर्धत पुढे जातील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी