31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeक्रिकेट२५ वर्षांनंतर भारताच्या भूमीवर भारत-बांगलादेश एकत्र

२५ वर्षांनंतर भारताच्या भूमीवर भारत-बांगलादेश एकत्र

भारतात क्रिकेट विश्वचषकाचे वारे वाहत आहेत. क्रिकेट रसिक सामन्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. अशातच भारताने सलग तीन विजय मिळवले आहेत. यामुळे आता भारताचा आत्मविश्वास वाढला आहे. आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना हाेणार आहे. एक नाही दोन नाही तब्बल २५ वर्षांनी हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. यामुळे आयसीसी वनडे क्रिकेट विश्वषकात हा सामना लक्षवेधी ठरेल. दोन्हीही संघ तुल्यबळ असून या संघादरम्यानचा भारतात झालेला शेवटचा सामना हा १९९८ सालात वानखेडे स्टेडियमवर झाला होता. यामुळे या सामन्याकडे एनेकांचे लक्ष लागले आहे.

भारतात सुरू असलेल्या वनडे विश्वचषक सामन्यात आज भारत आणि बांगलादेश यांच्यात टक्कर होणार आहे. दोन्ही संघ हे तुल्यबळ असून या विश्वचषकातील हा १७ वा सामना असणार आहे. दोन्ही संघाचा आजचा विश्वचषकातील हा ४ सामना आहे. दुपारी २ च्या सुमारास हा सामना सुरू होणार आहेत. दरम्यान, भारताने या विश्वचषकात आतापर्यंत झालेले तीनही सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशने तीन सामन्यांपैकी एकाच सामन्यात विजय मिळवला आहे. या दोन्ही संघाचा आतापर्यंत झालेल्या क्रिकेटचा मागोवा पाहिल्यास भारत वरचढ आहे. मात्र असे असले तरीही भारत बांगलादेश या संघाला कधीच हलक्यात घेत नाहीत.


हेही वाचा

गाझामधील लहान मुलांचा तरी विचार करा, इस्राइल-हमास युद्धावरुन सोनम झाली भावुक

‘लागिरं झालं जी’मधली आज्याच्या मामीने सांगितला आयुष्यातील बिकट प्रसंग

प्रभासच्या ‘सलार’मध्ये राणी मुखर्जीच्या हिरोची एन्ट्री

भारत-बांगलादेश सामन्यातील थोडक्यात मागोवा

मागील वर्षभरात या दोन्ही संघादरम्यान ४ सामने झाले होते. अशावेळी बांगलादेशने ४ सामन्यांपैकी ३ सामन्यात आपला विजय मिळवला होता. तर भारताने केवळ एकाच सामन्यात विजय संपादन केले. तर काही दिवसांपूर्वी आशिया कप पार पडला. यावेळी भारतावर बांगलादेशचा वचक होता. बांगलादेशने चांगली कामगीरी केली असून सुपर फोरमध्ये भारताला  हरवले होते.

४१ वा सामना पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर

या दोन्ही संघात आतापर्यंत ४० सामने झाले आहेत. या ४० सामन्यांपैकी ३१ सामने हे भारताने जिंकले आहेत. तर त्यापैकी ८ सामने बांगलादेशने जिंकले आहेत. यातील १ सामना हा बरोबरीत सुटला आहे. आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर होणारा सामना हा ४१ वा सामना असेल हा सामना कोण विजयी होईल हे पाहणे उत्कंठावर्धक राहील. जर भारताने ह्या सामन्यात विजयी संपादन केला तर भारत विजयाचा चौकार मारेल. बांगलादेशने या सामन्यात जर पराभव पत्करला तर पराभवाची हॅट्रीक बांगलादेश करेल, हे येत्या काही तासातच स्पष्ट होईल.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी