33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमनोरंजन'लागिरं झालं जी'मधली आज्याच्या मामीने सांगितला आयुष्यातील बिकट प्रसंग

‘लागिरं झालं जी’मधली आज्याच्या मामीने सांगितला आयुष्यातील बिकट प्रसंग

चित्रपट असो वा नाटकातील कलावंत त्यांनाही भावभावना असतात. कुटुंबात राहत असताना तेही सुख आणि दु:खाचा सामना करत असतात. प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कलाकारांच्या मनात काही ना काही ठसठसत असते. ‘लागिरं झालं जी’ या मालिकेने प्रत्येकाच्या घरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे कल्याणी चौधरी सोनोनेला ओळखले जाते. या मालिकेत तिने ‘पुष्पा’ हे पात्र साकारले होते. नवरात्रीनिमित्ताने तिने पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या बिकट प्रसंगाबाबतची माहिती इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून शेअर केली आहे.’ निळा रंग व्यापकता दाखवतो. तीच व्यापकता खेळाडू वृत्तीने घेत मी आणि खुशी अगदी खुशीत हसत खेळत आयुष्य भरभरुन जगत आहोत, असे कल्याणी नंदकिशोर यांनी म्हटले आहे.

या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ती लिहिते की, ‘मी कल्याणी नंदकिशोर म्हणजेच झी मराठीवरील ‘लागिरं झालं जी’मधली आज्याची मामी, ‘मन झालं बाजिंदं’. मधली गुली मावशी, कलर्स मराठी वरील ‘राजा राणी ची गं जोडी’मधली पंजाबरावची बायको कल्याणीबाई, सन मराठी वरील ‘शाब्बास सूनबाई’मधली ईश्वरी. २७ नोव्हेंबर २०१४ ला खुशीचा जन्म झाला आणि साधारण १५ दिवसातच तिच्या हृदयाला छिद्र असल्याचं आम्हाला समजलं. अनेक तज्ञ डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिच्या अनेक तपासण्या झाल्यानंतर आणखी एक निदान समोर आलं. तिच्या हृदयापासून फुप्फुसापर्यंत अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या बंद आहेत हे त्या तपासण्यामधून समजलं.’

‘अनेकदा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केले पण तिच्या शरीराची अंतर्गत रचना याप्रकारे आहे की तिला भूल देणंसुद्धा शक्य होत नव्हतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार खुशी जास्तीत जास्त सहा महिने जगू शकणार होती. पण मला विश्वास होता की स्वामी आई माझ्या पोटी जन्माला आलेली आहे आणि तीच या संकटातून मला आणि माझ्या लेकीला बाहेर काढेल.आज खुशी १० वर्षांची झाली आहे. या १० वर्षांत अनेकदा तिच्यावर संकटं आली. पण माझा विश्वास आणि आम्ही सगळे मिळून तिची घेत असलेली काळजी याच्या जोरावर ती प्रत्येक संकटातून बाहेर पडलेली आहे आणि पुढेसुद्धा ती हा लढा सुरुच ठेवेल अशी मला खात्री आहे.’
हे सुद्धा वाचा 

प्रभासच्या ‘सलार’मध्ये राणी मुखर्जीच्या हिरोची एन्ट्री
चित्रपट फ्लॉप ठरत असल्याने सलमान खानने घेतला ‘हा’ निर्णय
राष्ट्रीय पुरस्कार पटकावताना लग्नातली साडी नेसली… काय म्हणाली आलिया भट्ट
‘आजचा रंग निळा. निळा रंग म्हणजे पाण्याचं आणि आकाशाचं प्रतीक. निळा रंग व्यापकता दाखवतो. तीच व्यापकता खेळाडू वृत्तीने घेत मी आणि खुशी अगदी खुशीत हसत खेळत आयुष्य भरभरुन जगत आहोत, असे कल्याणी नंदकिशोर यांनी म्हटले आहे. सध्या नवरात्री उत्सव सुरू आहे. या उत्सवाच्या निमित्ताने अनेक जण आपल्या आयुष्यात घडलेल्या घटना समाज मध्यमांवर शेअर करत असतात. कल्याणी नंदकिशोर हिने अशीच पोस्ट शेअर केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी