29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमनोरंजनगाझामधील लहान मुलांचा तरी विचार करा, इस्राइल-हमास युद्धावरुन सोनम झाली भावुक

गाझामधील लहान मुलांचा तरी विचार करा, इस्राइल-हमास युद्धावरुन सोनम झाली भावुक

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून इस्त्रायल आणि हमास या अतिरेकी संघटनेच्या युद्धात लाखो निरापराध माणसांचे बळी गेले आहेत. गाझा येथे लहान मुलांची संख्या जास्त आहे. या निष्पाप जीवांचा विचार करा, असे आवाहन अभिनेत्री सोनम कपूरने केले आहे. सोनम आपल्या एका वर्षाच्या मुलाच्या संगोपनासाठी बॉलिवूडपासून लांब आहे. मात्र मातृत्वाच्या भावनेने उद्विग्न झालेल्या सद्यस्थितीतील गाझावरील हल्ले कित्येक निष्पाप मुलांचा बळी घेत असल्याचा मुद्दा सोनम कपूरने मांडला.

सोनम आपल्या बेताल आणि तर्कहीन वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. अभिनयाचा गंध नसल्याने सोनमने इंडस्ट्रीत कसेबसे दिवस ढकललेत. अखेरीस २०१७ साली सोनमने बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले. दहा वर्ष स्ट्रगल केल्यानंतरही तिला चांगल्या चित्रपटाच्या ऑफर्स आल्या नाहीत. सोनमला सिनेमासृष्टीत लाँच करणाऱ्या संजय लीला भन्साळी यांनीही तिची खराब ऍक्टिंग पाहून पाठ फिरवली. संजय लीला भन्साळी यांनी दीपिका पाडूकोणसोबत सलग तीन सिनेमे केले. या प्रकारानंतर सोनम संजय लीला भन्साळीवर भडकली. सोनमने जाहीरपणे बेताल वक्तव्ये सुरु केली. या घटनेपासून सोनमच्या सार्वजनिक वक्तव्यांची खिल्ली उडवली जाते.


मात्र इस्त्रालयवरील हल्ल्यावर सोनमने सूचक वक्तव्य केले आहे. “या भ्याड हल्ल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणामी झाला आहे. लाखो निरपराध लोकांचा बळी गेला आहे. राष्ट्र हितासाठी, तसेच जागतिक पातळीवर मानव हितासाठी ही निश्चितच हितावह बाब नाही. युद्ध थांबवण्यासाठी संबंधितांवर दबाव आणणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे,” असे सोनल म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gigi Hadid (@gigihadid)


सोनमने इंस्टाग्रामवर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार गिगी हॅडिड यांची इस्त्रालयमध्ये सुरु असलेल्या युद्धाबद्दल पोस्ट शेअर केली. ‘इस्त्रायल आणि पॅलेस्टायल वादात युद्धामुळे असह्य जीवन नशिबी आलेल्या नागरिकांच्या परिस्थितीचा विचार करा. युद्धास कारणीभूत नसलेल्या नागरिकांना मारणे योग्य नाही.’ असा मुद्दा गिगी हदीदने मांडला. रोज मरणारसन्न आयुष्य जगणाऱ्या नागरीकांना या अवघड परिस्थितीतून बाहेर काढणे गरजेचे आहे. ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे, या गिगी हदीद यांच्या मुद्द्याशी सोनमने सहमती दर्शवली. यावर दोन्ही पक्षातील युद्धात कोणाचाही बळी जाऊ नये, अशी सोनम कपूरने इच्छा व्यक्त केली.

हे ही वाचा 

चित्रपट फ्लॉप ठरत असल्याने सलमान खानने घेतला ‘हा’ निर्णय

राष्ट्रीय पुरस्कार पटकावताना लग्नातली साडी नेसली… काय म्हणाली आलिया भट्ट

लग्नानंतर पहिल्यांदाच लॅक्मे फॅशन वीकमध्ये परिणीती साडीत अवतरली!

सोनम नुकतीच ‘थँक यु फॉर कमिंग’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये दिसून आली. चित्रपटाची निर्माती सोनमची बहीण रेहा कपूर असल्याने आपण प्रमोशन केल्याने चित्रपट हिट होईल असा सोनमचा समज होता. मात्र चित्रपट चांगलाच आपटला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी