33 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमनोरंजनप्रभासच्या 'सलार'मध्ये राणी मुखर्जीच्या हिरोची एन्ट्री

प्रभासच्या ‘सलार’मध्ये राणी मुखर्जीच्या हिरोची एन्ट्री

‘जवान’ चित्रपटाच्या धास्तीने प्रभासच्या बहुचर्चित ‘सलार’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत अद्यापही संधिग्धता आहे.
‘सलार’बाबत चर्चा होत राहावी यासाठी निर्मात्यांनी चित्रपटातील अजून एका महत्त्वाच्या पात्राविषयी पोस्टर प्रदर्शित करून माहिती दिली आहे. दक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन प्रभास या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. पृथ्वीराज सुकुमारनने आपल्या चाळीसाव्या वाढदिवसानिमित्त सलार चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर पोस्ट केला. पृथ्वीराजचा रावडी लुक पाहून ‘सलार’ चित्रपटात तो नकारात्मक भूमिकेत असल्याची चर्चा आहे. याआधी पृथ्वीराजने राणी मुखर्जीच्या ‘अय्या’ चित्रपटातून हिंदी सिनेमांत पदार्पण केले होते.

दक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारने आपल्या चाळीसाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना याबाबतची माहिती इंस्टाग्राम हॅन्डलवरून दिली. ‘सलार’मधील आपल्या पात्राचा फोटो पोस्ट करताच पृथ्वीराजचा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला. कपाला टिळा, वाढलेली मिशी, नाकात रिंग, कानात इयरिंग्स आणि गळ्यात चोकर असा पृथ्वीराजचा लूक आहे. पृथ्वीराज लोक केवळ त्याच्या कॅरेक्टर विशेष नव्हे तर चित्रपटाविषयी कुतहून निर्माण करण्याचे काम करतो. या चित्रपटात पृथ्वीराज वर्धराजा मन्नारची भूमिका साकारली आहे. त्याच्या जोडीला प्रभास आणि श्रुती हसन मुख्य भूमिकेत असून, जगपती बाबू, टिनू आनंद, ईश्वरी राव श्रेया रेड्डी, रामचंद्र राजू यांच्याही भूमिका आहेत.

प्रभासचा जून महिन्यात प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ दणाणून आपटला. या चित्रपटाबाबत प्रभासला फार अपेक्षा होत्या. सुमार दर्जाच्या व्हिएफएक्समुळे चित्रपट फारसा चालला नाही. ‘बाहुबली- द कनक्लूजन’ चित्रपटानंतर प्रभासने फ्लॉप चित्रपटांची हॅटट्रिक केली आहे. प्रभासच्या ‘साहो’, ‘राधेश्याम’ आणि ‘आदीपुरुष’ तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारले. प्रभास ‘सलार’ चित्रपटाबाबत कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाहीये. ‘सलार’ २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाशी स्पर्धा नको म्हणून प्रभासच्या आग्रहास्तव ‘सलार’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. ‘सलार’ येत्या नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होईल.

हे सुद्धा वाचा 

चित्रपट फ्लॉप ठरत असल्याने सलमान खानने घेतला ‘हा’ निर्णय
दैव देते आणि कर्म नेते; दीड कोटी जिंकलेल्या पोलिसावर कारवाई!
राष्ट्रीय पुरस्कार पटकावताना लग्नातली साडी नेसली… काय म्हणाली आलिया भट्ट

प्रभास सध्या कोणत्याही सार्वजनिक कर्यक्रमाला दिसून येत नाही. चित्रपट फ्लॉप ठरत असल्याने चाळीशीपार केलेल्या प्रभासला आता लग्नाचे वेध लागले की काय अशीही चर्चा आहे. प्रभास सततच्या फ्लॉप चित्रपटामुळे नैराश्यतेत अडकल्याची भीतीही व्यक्त होत आहे. याबद्दल प्रभास आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियातूनही संवाद साधत नसल्याने त्याच्याविषयी उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे. दुसरीकडे प्रभास सलारमधील आपल्या नावडत्या सीन्सला सिनेमात घेऊ नका, असा दिग्दर्शकाकडे हट्ट करत असल्याचीही चर्चा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी