25 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरक्रिकेटवर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज, वनडे सह तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल

वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज, वनडे सह तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल

शुक्रवारी (23 सप्टेंबर) मोहालीमधील आर. एस. बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या वन डे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच गडी राखून विजय मिळवला. मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीमुळे तसेच फलंदाजांच्या उपयुक्त खेळीमूळे भारताला बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धुळ चारता आली. भारताच्या विजयामुळे पुरुषांच्या एकदिवसीय संघ क्रमवारीत भारताने अव्वल क्रमांक पटकावला आहे. भारतीय संघ आधीपासूनच टी-20 आणि टेस्ट फॉर्मटमध्ये पहिल्या नंबरवर होता. आता वनडे मधील या विजयानंतर वन डे रॅंकींग मध्येही भारताने अव्वल स्थान पटकावले आहे. या विजयासह क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान पटकावून भारतीय क्रिकेट संघाने एक दुर्मिळ कामगिरी केली आहे.

भारताने पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून विजय मिळवला. कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. राहुलचा हा निर्णय सार्थ ठरवत मोहम्मद शमीचे पाच विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाला सर्वबाद 276 धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरादाखल शुभमन गिल आणि रुतुराज गायकवाड यांनी 142 धावांची सलामी दिली. शुभमन आणि ऋतुराज या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर, झटपट विकेट्स गमावूनही, राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांनी भारताचा डाव सावरला आणि भारताला विजय मिळवून दिला.

या विजयानंतर आयसीसीने प्रसारित केलेल्या क्रमवारीनुसार, भारताने अव्वल स्थान पटकावले असून भारताने 116 रेटिंग गुण मिळवले आहे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान 115 रेटिंग गुण मिळवून क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलिया 111 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

या विजयामुळे, ऑस्ट्रेलियाला यापुढे विश्वचषकात प्रथम क्रमांकाचा संघ बनण्याची संधी उरलेली नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाने उर्वरित दोन सामने जिंकल्यास पाकिस्तान अव्वल स्थानावर जाऊ शकतो.

हे ही वाचा 

गणपतीतील गर्दीवर नियंत्रण गरजेचे !

लालबागचा राजा गणेशोत्सवात चेंगराचेंगरीमध्ये महिला-बालकांचे शोषण

भारत – ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडेमध्ये शमीचा जलवा, ऑसींसमोर केला नवा विक्रम

सर्व फॉरमॅटमध्ये प्रथम रँकिंग मिळवण्याची पुरुषांच्या क्रिकेट इतिहासातील ही केवळ दुसरी वेळ आहे. याआधी, केवळ दक्षिण आफ्रिकेने ऑगस्ट २०१२ मध्ये ही कामगिरी केली होती.

टेस्ट फॉर्मेटमध्ये, भारताने उल्लेखनीय कामगिरी करत खेळात सातत्य दाखविले आहे, ज्याचा परिणाम म्हणून त्यांनी सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश केला, तरीही अंतिम सामना जिंकण्यात भारत अपयशी ठरला होता. टि-20 मध्येही, भारताने खूपच प्रभावी कामगिरी केली आहे. 2022 मध्ये झालेल्या टि-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतपर्यंत भारतीय संघ पोहोचू शकला होता.

आता, काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या वर्ल्डकप स्पर्धेआधी भारताने वन डे क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे, भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला असून ह्याचा परिणाम वर्ल्डकपमध्ये कशाप्रकारे पाहायला मिळणार ह्याची उत्सुकता भारतीय क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी