25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमुंबईलालबागचा राजा गणेशोत्सवात चेंगराचेंगरीमध्ये महिला-बालकांचे शोषण

लालबागचा राजा गणेशोत्सवात चेंगराचेंगरीमध्ये महिला-बालकांचे शोषण

नवसाला पावणारा गणपती अशी माध्यमांनी गेल्या काही वर्षात प्रतिमा तयार केलेल्या लालबागचा राजा गणेशोत्सवात दरवर्षी या मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून महिला पोलिसांसह सामान्य भाविकांना अपमानास्पद वागणूक देण्यात येते. असे असताना या गणेशोत्सवात गर्दी काही कमी होत नाही. ‘गर्दीत चेंगराचेंगरीमध्ये महिला बालकांचे शोषण सुरू आहे त्यामुळे राज्य महिला आयोग व बालहक्क आयोगाने तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी,’ अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता ॲड‌. दीपक सोनावणे यांनी केली आहे.

महाराष्ट्रात गणेशोत्सव आणि अन्य सणांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळेच की काय गणेशोत्सव काळात पुणे, मुंबई आणि ठाणे आदी जिल्हे आनंद, उत्साह यांनी उजळून निघतात. पुण्याची गणपतींची रोषणाई, मुंबईच्या उंचचउंच मूर्ती पाहण्यासाठी देश-विदेशातील भाविक येत असतात. एकेकाळी गणेश गल्लीमधील उंच गणेशमूर्ती भविकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असायची. पण माध्यमांमुळे लालबागचा राजा गणेशोत्सव अचानकच प्रसिद्ध झाला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, अमिताभ बच्चन, शिल्पा शेट्टी यांच्यासह डझनभर सिनेकलाकार, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांच्यासारखे माजी क्रिकेटपटू दरवर्षी या लालबागच्या राजाला हजेरी लावत असल्याने अशा व्हीआयपी मंडळींमुळे हा गणेशोत्सव आणखीन प्रसिद्ध झाला. पण यात खऱ्या अर्थाने कोंडी होते ती सामान्य भक्तांची.

मोठमोठ्या रांगा लावून भाविक गणपतीचे दर्शन घेतात. पण गणेश मूर्तीजवळ भाविक आल्यावर मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी होते. या मंडळाचे पांढरे वस्त्र परिधान केलेले कार्यकर्ते महिला असो वा पुरुष कोणाकडेही पाहत नाहीत, त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. यात महिला पोलीसही सुटलेल्या नाहीत.
हे सुद्धा वाचा

लोकशाही चॅनल 72 तास बंद ठेवण्याचे आदेश
मंत्रालयात शुकशुकाट, कर्मचाऱ्यांची मज्जाच मजा
सोलापूर शहरात हातभट्टी दारूला लगाम! राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठिकठिकाणी धाडसत्र..

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ परिसरात होणारी गर्दी अनेक आंबटशौकीन मंडळींसाठी पर्वणी ठरते. काही विकृत यावेळी महिलांवर अतिप्रसंग करतात. २०१३ मध्ये लालबागमध्ये काही तरुणीवर अतिप्रसंग होत असल्याचे छायाचित्र ‘मिड डे’ या सायं दैनिकाचे प्रधान छायाचित्रकार अतुल कांबळे यांनी टिपले होते. त्यानंतर आरोपींना अटक झाली होती.

असे सगळे काही असताना लालबागच्या राजाची गर्दी कमी करणे हे मोठेच आव्हान दरवर्षी पोलिसांना असते. त्यामुळेच की काय अशा सगळ्या घटना पाहता, ‘लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ शासनाने पूर्ण ताब्यात घ्यावे कारण मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पाय जमिनीवर नाही. पूर्ण नियोजन बिघडले आहे. गर्दीत चेंगराचेंगरीमध्ये महिला बालकांचे शोषण सुरू आहे त्यामुळे राज्य महिला आयोग व बाल हक्क आयोगाने तातडीने लक्ष घालून योग्यती कारवाई करावी’ अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता ॲड‌. दीपक सोनावणे यांनी केली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी