31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्रिकेटबूमराह झाला 'बाप'! इन्स्टावरुन दिली ही मोठी बातमी..

बूमराह झाला ‘बाप’! इन्स्टावरुन दिली ही मोठी बातमी..

आशिया चषकात आज (सोमवार, ४ सप्टेंबर) भारताचा सामना नेपाळशी होणार आहे. परंतु, या सामन्यापूर्वीच भारताचा स्टार बॉलर जसप्रीत बूमराह हा मायदेशी परतला होता. आता बूमराहचे पुन्हा भारतात येण्याचे कारण समोर आले आहे. जसप्रीत बूमराह आणि त्याची पत्नी संजना गनेसन हे आई-वडील झाले असून संजनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याबाबत सोशल मिडियावर पोस्ट करत जसप्रीत बूमराहने याची माहिती दिली.

आशिया चषकतील अ गटातील भारताचा साखळी सामना आज नेपाळविरुद्ध होणार आहे. परंतु, सामन्याच्या एक दिवस अगोदरच यॉर्कर किंग बूमराह हा माघारी परतला होता. त्यांचे मायदेशी परतण्याचे कारण हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. त्यामुळे, भारतीय क्रिकेट रसिकांना धक्का बसला होता. पण आज त्याने दिलेल्या ह्या गोड बातमीतून खरे कारण स्पष्ट झाले आहे.

हे आहे बूमराहच्या मुलाचे नाव..
जसप्रीत बूमराहने इन्स्टाग्रामवरुन ही बातमी देत आपल्या बाळाचे नावही जाहीर केले आहे. संजना आणि जसप्रीतने आपल्या बाळाचे नाव ‘अंगद’ ठेवले असून अंगदच्या येण्याने ते दोघेही खूपच आनंदी झाले आहेत.

काय म्हणाला बूमराह?
“आमचे छोटे कुटुंब मोठे झाले आहे आणि आमची अंतःकरणे कल्पनेपेक्षा भरलेली आहेत! आज सकाळी आम्ही आमच्या लहानग्याचे, अंगद जसप्रीत बुमराहचे जगात स्वागत केले. आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. आमच्या आयुष्यातील हा नवीन अध्याय घेऊन येणार्‍या प्रत्येक गोष्टींसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत,” असं जसप्रीत बुमराहने ट्विट करत म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

बूमराहचे पुनरागमन कधी होणार?
नुकताच बाप झालेला बूमराह आजच्या नेपालविरुद्ध सामना खेळण्यासाठी उपलब्ध नसेल. आशिया चषक स्पर्धेतील पुढील फेरीत म्हणजेच सुपर 4 लढतीनसाठी जसप्रीत बूमराहचे संघात पुनरागमन होणार आहे. शनिवारी, 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या लढतीत बूमराहने आक्रमक फलंदाजी करत पाकिस्तानच्या तेज गोलंदाजीला दिवसा तारे दाखवले होते. परंतु, सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने सामना थांबविण्यात आला आणि दोन्ही संघांना समान गुणांचे वाटप करण्यात आले. पावसाच्या व्यतयामुळे भारताला गोलंदाजी करता आली नाही.

हे ही वाचा 

आपला लाडका मॅडी झाला एफटीआयआयचा अध्यक्ष

Happy Birthday इशांत शर्मा | क्रिकेटशिवाय इशांतला आवडतात ह्या गोष्टी..

दहीहंडी उत्सव : गोविंदासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय !

सध्या संघात बूमराह उपलब्ध नसला तरी संघाला त्याचा जास्त काही फटका बसणार नाही. संघात अजूनही मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांसारखे जलदगती गोलंदाज उपलब्ध आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी