31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्रिकेटHappy Birthday इशांत शर्मा | क्रिकेटशिवाय इशांतला आवडतात ह्या गोष्टी..

Happy Birthday इशांत शर्मा | क्रिकेटशिवाय इशांतला आवडतात ह्या गोष्टी..

इशांत शर्मा हा भारतीय क्रिकेटपटू आहे. सुमारे 135 किमी/तास वेगाने उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज म्हणून इशांत प्रसिद्ध आहे. आज 2 सप्टेंबरला इशांतनं वयाची पस्तीशि पार केली आहे.
इशांत शर्मा मूळ दिल्लीचा. इशांत शर्माने दिल्लीच्या गंगा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. शाळेत प्रशिक्षक श्रावण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं  क्रिकेटचे धडे गिरवले. वयाच्या 16 व्या वर्षी इशांतनं क्रिकेटकडे जास्त लक्ष केंद्रित केलं. इशांतच्या कुटुंबातील कोणीही क्रिकेट खेळलेलं  नाही. तो नेहमी ग्लेन मॅकग्राला आदर्श मानत असे. क्रिकेटशिवाय इशांतला व्हॉलीबॉल आणि फुटबॉल खेळायला आणि मित्रांसोबत फिरायलाही आवडतं.
इशांतला लहानपणापासून क्रिकेट खेळायला आवडायचं .घरातून क्रिकेटची पार्शवभूमी नसल्याने दहावीनंतर त्यानं क्रिकेट खेळणं बंद करून केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. मात्र क्रिकेटप्रेम त्याला स्वस्थ बसू देईना.अखेरीस इशांतनं अभ्यासाला रामराम ठोकला. त्यानं क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. इशांत आणि विराट कोहली एकाच वेळी 19 वर्षांखालील अंडर-19 आणि कसोटी क्रिकेट सामान्यात आले. कालांतराने इशांत रणजी क्रिकेट खेळू लागला.
17 फेब्रुवारी 2008 रोजी अॅडलेड येथे रंगलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सामान्यात इशांतनं 152.6 किलोमीटर ताशी वेगानं चेंडू टाकला. एवढ्या वेगानं चेंडू टाकणारा इशांत दुसरा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज ठरला. बरेचदा इशांतची तुलना भारतीय वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथशीही केली जात आहे.
हे ही वाचा 
10 डिसेंबर 2016 रोजी इशांतनं भारतीय बास्केटबॉल महिला संघाची खेळाडू प्रतिमा सिंगसोबत लग्न केलं. भारतातील सर्वात लोकप्रिय जोड्यामध्ये इशांत आणि प्रतिमाचे नाव घेतलं जातं. ईशानचं करिअर घडवण्यात प्रतिमा सिंगचा मोठा वाटा समजला जातो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी