31 C
Mumbai
Monday, September 4, 2023
घरक्रिकेटपाकिस्तानी तरुणी म्हणाली 'त्याच्या' ऐवजी विराट कोहलीची निवड करेन

पाकिस्तानी तरुणी म्हणाली ‘त्याच्या’ ऐवजी विराट कोहलीची निवड करेन

एशिया कप 2023 मधील तिसरा सामना काल श्रीलंकेत झाला, मात्र ऐनवेळी पावसामुळे सामना अनिर्णित राहिला. मात्र हा सामना एका पाकिस्तानी तरुणीमुळे चर्चेत आला. या तरुणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर रविवारपासून व्हायरल होत आहे. ही तरुणी खास विराट कोहलीला पाहण्यासाठी श्रीलंकेत भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी आली होती. सामना अनिर्णित राहिल्याने अनेकांची निराशा झाली. मात्र तरुणीच्या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधले आहे. तरुणीने विराट कोहलीचे तोंड भरुन कौतुक केले. मात्र विराट कोहली या सामन्यात लवकर बाद झाल्याने तरुणीचा काही प्रमाणात भ्रमनिरास झाला.

ही तरुणी माध्यमांशी बोलताना विराट कोहलीचे कौतुक करत होती. यावेळी ती म्हणाली विराट कोहली माझा आवडता खेळाडू आहे, त्याच्यासाठी हा सामना पाहण्याकरिता मी श्रीलंकेत आली होती. मात्र माझा अपेक्षाभंग झाला. विराट शतक करेल असे वाटले होते, मात्र तो बाद झाला. मी विराट कोहली आणि पाकिस्तानला पाठींबात देते.

याचवेळी एका पाकिस्तानी व्यक्तीने तरुणीला हटकले असता तरुणीने त्याची बोलती बंद करत चाचा शेजाऱ्यांवर प्रेम करण्यात कोणती चुक तर नाही ना? असा सवाल देखील त्याला केला. यावेळी विराट आणि बाबर आझम या दोघांना जर निवडावे लागले तर तु कोणाची निवड करशील असे तिला विचारले असता तीने विराट कोहलीचे नाव घेतले.


या तरुणीने आपल्या गालांवर भारत आणि पाकिस्तानच्या झेंड्यांचे टॅटू काढले होते. तीने कॅमेऱ्यासमोर दोनही देशांच्या झेंड्यांचे टॅटू दाखवित मी पाकिस्तानला देखील सपोर्ट करते असे म्हणत हा पाकिस्तान आणि हा इंडिया असे देखील मोठ्या आनंदाने म्हटले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी