29 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeक्राईमनाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षकाला शुक्रवारी (दि. १०) दुपारी अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षकाला (Assistant Superintendent) शुक्रवारी (दि. १०) दुपारी अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ( ACB) हा सापळा यशस्वी केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Assistant Superintendent of Nashik District Court in ACB net)

दिवाणी न्यायालयाचे सहायक अधीक्षक (Assistant Superintendent) मनोज दत्तात्रय मंडाले असे लाचखोराचे नाव आहे. तक्रारीनुसार, त्यांच्या आईच्या संमतीशिवाय शेतीचे खरेदीखत रद्द करण्याचा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करायचा होता. हा दावा दाखल करण्यासाठी लागणाऱ्या रकमेचा कोर्ट फी स्टॅम्प द्यावा लागतो. कोर्ट फी स्टॅम्प रक्कम भरल्यानंतर हे प्रकरण मंडाले याच्याकडे जमा करावे लागते. परंतु, प्रकरण जमा करण्यापूर्वी तक्रारदार हे प्रकरण कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून मिळण्यासाठी मंडालेकडे गेले असता त्या मोबदल्यात व प्रकरणात सहकार्य करण्यासाठी मंडाले याने गुरुवारी (दि.९) तक्रारदाराकडे ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार केली असता, विभागाने पडताळणी करून शुक्रवारी (दि. १०) दुपारी लाच स्वीकारताना मंडाले यास अटक केली. अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, हवालदार पंकज पळशीकर, प्रमोद चव्हाणके यांनी कारवाई केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी