29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रसदाभाऊ खोत यांनी पुणे महापालिका कार्यालयासमोर विकले कांदे-बटाटे

सदाभाऊ खोत यांनी पुणे महापालिका कार्यालयासमोर विकले कांदे-बटाटे

बार्शी येथील एका शेतकऱ्याला महामार्गाच्याकडेला कांदे विकतो म्हणून पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 40 हजारांचा दंड ठोठावला. तसेच दंड भरला नाही म्हणून टँम्पो देखील जप्त केला. हे प्रकरण रयत क्रांती सघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना कळताच. त्यांनी पुणे महापालिकेच्या कार्यालयासमोर आंदोलन करत कांदे-बटाटे विकले, त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसताच त्यांनी कोणताही दंड न आकारता संबंधित शेतकऱ्याचा टँम्पो सोडला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करून गुलाल उधळून तो टेम्पो शेतकऱ्यांच्या ताब्यात दिला.

गेली पाच वर्षे झालं शेतकरी कोरोना महामारी तसेच अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट व शेतीमालाला बाजार भाव नसणे तसेच आर्थिक मंदी यामुळे शेतकरी व शेती धंदा पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. दिवस रात्र कष्ट करून रक्ताच पाणी करून काबाड कष्ट करणारा बार्शी तालुक्यातील तावडी येथील शेतकरी रमेश आरगडे हा कांदा उत्पादक शेतकरी आपल्या कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने पुणे-सोलापूर हायवे वरती हडपसर येथे हायवे बाजूला आपला कांद्याचा टेम्पो लावून कांदा विकत होता.

तेव्हा पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त महादेव जगताप या अधिकाऱ्याने कार्यवाही करता ४० हजार रुपयाचा दंड केला. त्या शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व यापुढे महाराष्ट्रात कोणत्याही शेतकऱ्यांच्यावर अन्याय होऊ नये याकरिता रयत क्रांती संघटनेने शनिवारवाडा ते पुणे महानगरपालिका पर्यंत मोर्चा काढत लक्षवेधी आंदोलन केले. महानगरपालिकेच्या दारात आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना समोर बसून आंदोलन सुरू झाले.

तसेच ज्या अधिकाऱ्याने शेतमाल रस्त्याकडे लागतो म्हणून त्या अधिकाऱ्यांना त्या शेतकऱ्यांना चाळीस हजार दंड केला त्याच अधिकाऱ्याच्या अंगणात बसून सदाभाऊ खोत यांनी १० रुपये किलोने कांदे विकले. तेथील आक्रमकता पाहून तेथील प्रशासनाने एक शिष्टमंडळ बोलून घेतले व सदरचे शेतकऱ्याचे टेम्पो कोणताही दंड न करता सोडण्याचे कबूल केले. त्यानंतर तो शेतकरी संबंधित कार्यालयात गेल्यानंतर असा कोणताही आदेश वरिष्ठांकडून आम्हाला आलेला नाही. त्यामुळे आम्ही टेम्पो सोडणार नाही असे सांगून त्याला धडकावले.
हे सुद्धा वाचा
“अन्याय संपला, आम्हाला फाशी झाली तरी…”, अतिक-अश्रफच्या मारेकऱ्यांचा जबाब
खुनाचा गुन्हा असला तरी, दुष्मनी नव्हती; न्यायालयाने आरोपीला चार वर्षांची शिक्षा ठोठावली
नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना इंस्टाग्रामवरील ‘या’ फोटोमुळे झाली ट्रोल

हे सदाभाऊ खोत यांना कळताच त्यांनी महानगरपालिकेच्या गेटवर गेले. त्यावेळी सदाभाऊ खोत यांना पोलीस प्रशासनाने गेट वरच रोखले, तेव्हा सदाभाऊ खोत हे गेटवर चढून आपल्या शेतकऱ्यांसोबत आज जाऊन पुन्हा त्यांच्या ऑफिसच्या समोर बसले. आंदोलनाचा चढता वेगाने तेथील महानगरपालिकेचे प्रशासन ठप्प झाले. तात्काळ तेथील आयुक्त यांनी संबंधित टेम्पो तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आणि अर्ध्या तासातच टेम्पो महानगरपालिकेच्या गेटवर येतात सर्वच कार्यकर्त्यांनी जल्लोष करून गुलाल उधळून तो टेम्पो शेतकऱ्यांच्या ताब्यात दिला.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी