27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeक्राईममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या वॉर्ड बॉय ला...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या वॉर्ड बॉय ला पुण्यातून अटक

धारावी येथे राहणारा राजेश आगवणे हा पुणे येथे कामा निम्मंत गेला होता. पुढे त्याने नवी मुंबई नियंत्रण कशाला फोन करून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारून टाकणार आहोत, अशी धमकी दिली होती. याबाबत त्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

राजेश आगवणे हा 43 वर्षाचा आहे.तो मुंबईत धारावी येथे राहतो.तो मुंबईतील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीवर वॉर्डबॉयच काम करत असतो. तर त्याची बायको पुण्यात वारजे येथे राहते. ती एका दुकानात काम करते. राजेश नियमितपणे आपल्या बायकोला भेटण्यासाठी जात असतो. गेल्या काही दिवसांपासून तो वारजे येथे राहत आहे. गेली तीन दिवस तो रात्री दारू पिऊन कंट्रोल रूम ला फोन करत असतो. दोन दिवसांपूर्वी त्याने कंट्रोल रूमच्या 112 नंबरवर फोन करून माझ्या छातीत दुखत आहे. माझ्यासाठी ऍम्ब्युलन्स पाठवा. पोलिसांनी त्याला ऍम्ब्युलन्स साठी 108 नंबरवर फोन करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा कन्ट्रोल रूम ला फोन केला आणि त्याने मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारणार आहे, अस म्हणाला.

हे सुद्धा वाचा 

मला कुठलीही क्लीनचीट मिळालेली नाही : अजित पवार

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्याच्या कानशीलात लगावत कॅन्टीनला ठोकले सील!

एमएससीबी घोटाळा प्रकरणावर दाखल आरोपपत्रात अजित पवार यांच नाव नाही

यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला असता तो वारजे येथे असल्याचं उघडकीस आलं. यामुळे मग या गुन्ह्याचा तपास पुणे पोलीस दलाच्या वारजे पोलीस स्टेशनकडे सोपवण्यात आला.वारजे पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर राजेश आगवणे याला अटक केली. त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. दारूच्या नशेत त्याने हे फोन केल्याचं पोलिसांच म्हणणं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी