30 C
Mumbai
Monday, September 16, 2024
Homeक्राईमबाल विवाह लावल्याप्रकरणी कुटुंबावर गुन्हा

बाल विवाह लावल्याप्रकरणी कुटुंबावर गुन्हा

मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिचा अल्पवयीन मुलासोबत विवाह लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे . या बालविवाहतील वर व वधून दोघेही अल्पवयीन असून विवाहनंतर मुलगी अल्पवयातच गरोदर राहिल्याने तिने सहा महिन्याच्या मृत गर्भास जन्म दिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मध्यप्रदेशमधील एका कुटुंबाविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिचा अल्पवयीन मुलासोबत विवाह ( child marriage) लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे . या बालविवाहतील ( child marriage) वर व वधून दोघेही अल्पवयीन असून विवाहनंतर मुलगी अल्पवयातच गरोदर राहिल्याने तिने सहा महिन्याच्या मृत गर्भास जन्म दिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मध्यप्रदेशमधील एका कुटुंबाविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Family booked for child marriage)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील ता. वरना, देवली दुगानी, बडवाणी, सैंधवा येथील रा. छापरीयानाचा मूळचा राहणार असलेला एक अल्पवयीन संशयित सध्या नाशिकरोड भागातील रा. गाडेकर मळा, एकलहरा रोड भागात राहत असून त्याच्या आई व वडिलांनी त्याचा विवाह एका अल्पवयीन मुलीशी लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन संशियातसह त्याचे आई व वडील (रा. छापरीयाना गाव, सेंधवा, मध्यप्रदेश) यांच्याविरोधात पोस्कोअंतर्गत व बालविवाह ( child marriage) प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांनी मुलगा व मुलगी दोघेही अल्पवयीन असल्याचे माहित असूनही त्या दोघांचा विवाह लावून दिला. दि. १ मे २०२२ ते ३० मे २०२४ या कालावधीत घडलेल्या या विवाहातून पिडित मुलगी गरोदर राहून तिने सहा महिन्याचा मृत गर्भास जन्म दिला.

त्यामुळे हा बालविवाहाचा ( child marriage) प्रकार उघडकीस आल्याने याप्रकरणी पोलिसांनी बरडे कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपासासाठी हा गुन्हा मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यात वरला पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी