27 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeक्राईमIIT मध्ये निवड झालेल्या हंसिकाने प्रियकरासोबत किडनॅपिंगचा केला बनाव; वडिलांकडे मागितली 10...

IIT मध्ये निवड झालेल्या हंसिकाने प्रियकरासोबत किडनॅपिंगचा केला बनाव; वडिलांकडे मागितली 10 लाखांची खंडणी

आयआयटी रुकरीमध्ये निवड झालेल्या कानपूरच्या एका तरुणीने प्रियकराच्या मदतीने आपले अपहरण झाल्याचे नाटक रचले आणि कुटुंबाकडे तब्बल 10 लाखांची मागणी केल्याची बातमी समोर आली आहे. शनिवारी तरुणीच्या वडिलांना एक व्हिडीओ मिळाला, मुलीच्या वडिलांनी जेव्हा मदतीसाठी मिळण्यासाठी धावाधाव केली तेव्हा हा प्रकार समोर आला. नंतर तरुणीच्या प्रियकराने तिच्या वडिलांकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. हंसिका वर्मा असे तरुणीचे नाव असून ती कानपूरची रहिवासी आहे. शुक्रवारी ती बेपत्ता झाली.

दरम्यान तरुणीच्या वडिलांना खंडणीसाठी फोन आल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांत किडनॅपिंगची तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखत तातडीने तपासकार्य हाती घेतले. मात्र हे प्रकरण संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

पोलीस तपासात उघड झाले की, हंसिकाचे राज सिंह याच्यावर प्रेमसंबंध होते. राज सिंह हा उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील रहिवासी असून तो देखील घरातून बेपत्ता झाला होता. तपासात पोलिसांना काही व्हिडीओ हाती लागले असून हंसिका राज सोबत फिरत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या तपासात हा अपहरणाचा नियोजनब्दध कट असल्याचे दिसून आले.

हे सुद्धा वाचा

पेशवे हे दुष्ट, नीच प्रवृत्तीचे होते; भालचंद्र नेमाडेंचं वक्तव्य, समाज माध्यमात नेमाडे यांच्यावर टीका

अजित पवार पत्रकारांना म्हणाले तुम्हाला उद्योग नाही, थांबा जरा आता माझं ऐका

बारा बलुतेदारांचे कल्याण होऊ दे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घातले खंडेरायाला साकडे

हंसिका आणि राजने केला विवाह, नेपाळला जाणार होते पळून

पोलिस तपासामध्ये हंसिकाने राज सिंह याच्यासोबत विवाह केल्याचे दिखील समोर आले आहे. या दोघांनी नेपाळला पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला मात्र सीमा ओलांडण्यापुर्वीच त्या दोघांनाही अटक करुन कानपूरला आणण्यात आले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हंसिका वर्मा आणि राज सिंह यांना अटक करुन ताब्यात घेतले आहे. हंसिकाचे किडनॅपिंग झालेले नसून तिच्या कुटुंबियांकडून पैसे उकळण्यासाठी त्यांनी हा बनाव केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून विवाह झाल्यासंबंधीचे एक प्रमाणपत्र देखील जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिस सखोल तपास करत आहेत. या जोडप्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील पोलिसांनी म्हटले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी