34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeक्राईमआई-वडिलांसाठी 'तो' बनला पोलिस

आई-वडिलांसाठी ‘तो’ बनला पोलिस

गोविंदा हा अभिनेता ‘राजाबाबू’ या चित्रपटात पोलिस, डॉक्टर अशा वेशभूषा करत आई-वडिलांचे  मनोरंजन करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पण एखादा व्यक्ती वास्तवात आई-वडिलांचे पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चक्क पोलिसांचे कपडे घालून फिरत असेल तर.. अशाच एका ‘राजाबाबू’ तरुणाला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अभिषेक सानप असे या अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे, तो नाशिक येथील सिन्नरमधील राहणारा आहे. या तरुणाच्या तपासात जी माहिती समोर आली ती ऐकून पोलिसही चकित झाले. अभिषेकच्या आई-वडिलांची इच्छा होती त्याने पोलीस बनावे. म्हणून अभिषेकने डुप्लिकेट गणवेश घेतला, माझे एसआरपीएफमध्ये सिलेक्शन झाले आहे, दौंडमध्ये माझे प्रशिक्षण सुरू आहे. मला रेल्वेमध्ये महिला डब्यात सुरक्षा कर्मचारीची ड्यूटी लागली आहे, असे आई वडिलांनी सांगितले होते.

कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले खाडे यांची वाशिंद रेल्वे स्थानकात ड्यूटी होती. ड्यूटी करीत असताना त्यांनी लोकलमध्ये एक गणवेशधारी पोलिस दिसून आला, फलाट क्रमांक दोनवर आलेल्या सीएसटी लोकल गाडीच्या मधल्या जनरल डब्यात हा उभा होता. खाडे यांना संशय आला त्यांनी या तरुणाची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या तरुनाला लोकलमधून उतरविण्यास सुरुवात केली. मात्र लोकल सुरु झाली. खाडे यांनी लगेच खडवली रेल्वे स्थानकातील पोलिसांना संपर्क केला. मात्र संपर्क न झाल्याने टिटवाळा रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलिसाशी संपर्क केला.

टिटवाळा रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीस आणि आरपीएफ महिला जवान टेके यांच्या मदतीने गण‌वेशधारी पोलिसाला गाडीतून उतरविले. कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ पोलिस निरिक्षक अर्चना दुसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी जी. बी. राणे यांनी तपास सुरू केला. अभिषेक हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील खंबाळे येथील भोकनी गावचा राहणारा आहे.
हे सुद्धा वाचा 

कंत्राटी भरतीप्रकरणी जितेंद्र आव्हाडांचा करारा जवाब

नाशिक ड्रग्ज प्रकरण: आठ किलो सोन्याची खरेदी करणारा ‘तो’ सराफ व्यावसायिक कोण?
धनंजय मुंडेंनी सांगितले उद्धव ठाकरेंचे पाप!
तो बारावी शिकलेला आहे, त्याच्या आई-वडिलांची अभिषेकने पोलिस बनावे अशी इच्छा होती, त्याने आई वडिलांना एक वर्षापूर्वी सांगितले की, एसआरपीएफमध्ये नोकरी लागली आहे. त्यानंतर त्याने त्याचे दौंडमध्ये प्रशिक्षण सुरू आहे. त्यानंतर तो रेल्वेच्या महिला डब्यात पोलिसांचा गणवेश घालून प्रवास करत होता, त्याच्या पोलिस असण्याविषयी रेल्वे पोलिसांनाच संशय आल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या नकली पोलिसाला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांचा गणवेश घालून कोणी असा समाजात वावरत असेल तर त्याची माहिती द्या असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी