31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeटेक्नॉलॉजी'इस्रो'नं पुन्हा करून दाखवलं, 'गगनयान'ची पहिली चाचणी यशस्वी

‘इस्रो’नं पुन्हा करून दाखवलं, ‘गगनयान’ची पहिली चाचणी यशस्वी

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या शास्त्रज्ञांचे पुन्हा एकदा जागतिक पातळीवर कौतुक केले जात आहे. गगनयान मोहिमेची आज सकाळी १० वाजता यशस्वी चाचणी झाल्यानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. भारताच्या गगनयान या मानवी अवकाश मोहिमेत अंतराळवीरांच्या सुरक्षेची खात्री ‘टीव्ही-डी१’मधील ‘क्रू मोड्यूल’द्वारे घेण्यात आली. यामुळे इस्रोच्या मानवरहित मोहिमांचा मार्ग मोकळा झाला आहे. आदित्य एल-१ आणि चांद्रयान-३ या दोन्ही मोहिमा इस्रोने यशस्वी केल्यांनंतर गगनयान मोहिमेची यशस्वी चाचणी केल्यामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांचे देशात कौतुक केले जात आहे. इस्रोची गगनयान मोहीम यशस्वी झाली तर अंतराळातील अनेक रहस्य उलगडू शकतील. श्रीहरिकोटा येथून गगनयानचे पहिले चाचणी उड्डाण करण्यात आले होते. भारताची गगनयान मोहीम २०२५ मध्ये प्रत्यक्षात राबवली जाणार आहे.

गगनयानच्या यशस्वी चाचणीमुळे भारताने अवकाश मोहिमेत आणखी एक नवा इतिहास रचला आहे. टीव्ही-डी१ ची पहिली मानवरहित चाचणी आज झाली. पण हे एवढ्यावरच नाही तर आणखी तीन चाचण्या घेतल्या जातील. टीव्ही-डी२, टीव्ही-डी३ आणि टीव्ही-डी४ अशा तीन चाचणी अजून व्हायच्या आहेत. या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर गगनयान मोहिमेचा मार्ग यशस्वी होईल. दरम्यान, ही चाचणी यशस्वी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे ट्वीट करून कौतुक केले आहे.

गगनयानच्या आजच्या टीव्ही-डी१ चाचणीला ‘अबॉर्ट टेस्ट’ असे नाव देण्यात आले होते. गगनयान मोहिमेत अंतराळवीरांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी हे चाचणी उड्डाण होते. या चाचणी दरम्यान मॉड्यूल अंतराळात नेण्यात आले. त्यानंतर ते ठराविक उंचीपर्यंत नेऊन बंगालच्या उपसागरात उतरवण्यात आले. ‘टीव्ही-डी१’मध्ये सुधारित विकास इंजिन आहे. त्याच्या पुढच्या भागात ‘क्रू मोड्यूल’ आणि ‘क्रू एस्केप सिस्टिम’ ही उपकरणे बसवली आहेत. हे यान ३४.९ मीटर उंच आणि ४४ टन वजनाचे आहे.

तांत्रिक अडचणीवर मात

गगनयानाचे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज लॉन्चिंग ठरले होते. पण, खराब हवामान आणि काही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे लॉन्चिंग होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले होते. मात्र, काही वेळात अडचणी दूर करण्यात यश आले आणि सकाळी १० वाजता गगनयानचे उड्डाण करण्यात आले.

हे ही वाचा

कंत्राटी भरतीप्रकरणी जितेंद्र आव्हाडांचा करारा जवाब

भारत-पाकिस्तान सीमेजवळ शिवछत्रपतींचा पुतळा

नाशिक ड्रग्ज प्रकरण: आठ किलो सोन्याची खरेदी करणारा ‘तो’ सराफ व्यावसायिक कोण?

रोबोट ‘व्योमीत्र’ अंतराळात जाणार

या चाचणीत क्रू मॉड्युलचे प्रक्षेपण करण्यात आले. पृथ्वीपासून १७ किलोमीटरवर यानापासून क्रू मॉड्युल वेगळे झाले. त्यानंतर ते बंगालच्या उपसागरात सुरक्षित उतरले. नौदलाने हे क्रू मॉड्युल ताब्यात घेतले. गगनयान मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ‘व्योमीत्र’ हे रोबोट अंतराळात पाठवण्यात येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी