34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रकंत्राटी भरतीप्रकरणी जितेंद्र आव्हाडांचा करारा जवाब

कंत्राटी भरतीप्रकरणी जितेंद्र आव्हाडांचा करारा जवाब

राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीवरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे. काल फडणवीसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जी आर रद्द करण्याबाबत कारण सांगितले. हा जी आर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील असल्याचे पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे कंत्राटी भरतीचे पाप हे १०० टक्के कॉंग्रेस आणि शरद पवारांचे आहे. त्यांचे पाप आमच्यावर नको, असे देखिल ते म्हणाले. याच मुद्द्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (२० ऑक्टोबर) दिवशी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी कंत्राटी भरतीबद्दल माफी मागावी असे वक्तव्य केले आता यावर राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाडांनी पवार साहेबांची आणि उद्ध्व साहेबांची लाज काढण्या इतके आपण मोठे झालात? याच विषयास अनुसरून आता आव्हाडांनी भाजपावर ताशेरे ओढले आहे. याविरोधात आता भाजपने माफी मांगो आंदोलनाचा इशारा दिला आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? 

काल सत्ताधारी पक्षातील एका मंत्र्याने चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरदचंद्रजी पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे यांनी माफी मागावी, या विधानानंतर त्यांना लाज वाटायला पाहिजे; खोटी माहिती पसरवतात, अशा पद्धतीचे विधान केलं. ज्या शासन निर्णयाचा ते उल्लेख करीत होते; तेव्हा ते स्वतः मंत्रिमंडळात होते आणि त्यांच्या सहकारी गटाचे ते नाव घेतात ते देखिल मंत्रिमंडळात होते. त्या जाहिरातीमध्ये ‘क’ आणि ‘ड’ गटांचा समावेश होता आणि त्या शासन निर्णयाची कधी अंमलबजावणी झाली नाही.

हेही वाचा

नाशिक ड्रग्ज प्रकरण: आठ किलो सोन्याची खरेदी करणारा ‘तो’ सराफ व्यावसायिक कोण?

गोपीचंद पडळकर पुन्हा शरद पवारांवर बरसले

भारत-पाकिस्तान सीमेजवळ शिवछत्रपतींचा पुतळा

आपण जी पदे काढण्याचा प्रयत्न केलात ती तहसीलदार व नायब तहसीलदार ही पदे होती. ती अत्यंत जबाबदारीची आणि राज्याच्या महसुली खात्याशी संबंधित होती. सातबारा, फेरफार अशी काही शेतकऱ्यांची कामे तसेच शहरातील मोठ्या उद्योग व्यावसायिकांची कामे यांच्याशी त्यांचा संबंध येतो. त्याचबरोबर त्यांच्याकडे काही न्यायालयीन अधिकार देखिल असतात. ही पदे MPSC मार्फत भरली जातात. ती पदे आपण कंत्राटी पद्धतीवर देणार होता. जळगावचे जिल्हाधिकारी यांनी तर जाहिरात देखील काढली होती. त्यांनी खुलेआम पत्रकारांना सांगितलं होतं की, मला वरून निरोप आला होता. पण तसा शासन निर्णय असल्यामुळे त्यांनी तहसीलदार व नायब तहसीलदार या पण पहिल्या शासन निर्णयामध्ये आपणही मंत्री म्हणून समाविष्ट होतात आणि दुसऱ्या शासन निर्णयामध्ये देखील मंत्री म्हणून आपण समाविष्ट होतात.

विद्यार्थ्यांची टिंगल 

MPSC ची पदे कमी करून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची टिंगल करणे, त्यांना कंत्राटी पद्धतीवर घेणे आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे हा गैरसमज नाही तर आपल्या चुका लोकांसमोर नेल्या होत्या एवढं वाईट वाटून घेऊ नका. लोक शहाणी झाली आहेत. भलेही आपण स्वतःला फार हुशार समजत असलो तरी लोकांनाही खुप काही कळत असतं.

तुम्ही काढलेल्या त्या शासन निर्णयाला महाराष्ट्रातील तरुणाईने प्रचंड विरोध केल्यामुळे कुठल्याही एका पक्षाचे हे यश नाही तर महाराष्ट्रातील तरुणांचे हे यश आहे. या तरुणांनी उभं राहण्याचं जे धाडस दाखवलं आणि कुठल्या प्रकारे आपण त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहात हे त्यांच्या लक्षात आलं. शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे ह्यांना लाज वाटली नाही का … हा मंत्री उद्धव साहेबांसोबत होता आणि बाकीचे ८ जण हे सुशील कुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात होते. पवार साहेबांची आणि उद्ध्व साहेबांची लाज काढण्या इतके आपण मोठे झालात? यावर त्यांनी करारा जवाब मिलेगा… असे ट्विट करत सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी