31 C
Mumbai
Saturday, June 15, 2024
Homeक्राईममुंढेगावजवळ विहिरीत आढळला मायलेकींचा मृतदेह

मुंढेगावजवळ विहिरीत आढळला मायलेकींचा मृतदेह

मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीजवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील एका विहिरीत २३ वर्षीय विवाहित महिलेसह तिच्या ३ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून इगतपुरी तालुक्यावर दुःखाचे सावट पसरले आहे.कालच तालुक्यातील भावली धरणात पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच हि घटना घडली आहे.

मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीजवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील एका विहिरीत २३ वर्षीय विवाहित महिलेसह तिच्या ३ वर्षीय मुलीचा मृतदेह (dead body) आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून इगतपुरी तालुक्यावर दुःखाचे सावट पसरले आहे.कालच तालुक्यातील भावली धरणात पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच हि घटना घडली आहे.(Mother’s dead body found in well near Mundhegaon)

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रियंका नवनाथ दराणे (वय २३) आणि वेदश्री नवनाथ दराणे (वय ३) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या मायलेकींचे नाव आहे. सदर विहिरीला कठडा नसल्याने विहिरीजवळ गेलेली बालिका विहिरीत पडल्याने तिला वाचवण्यासाठी आईने धाव घेऊन उडी मारली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे या घटनेत दोघींचा मृत्यू झाला असावा अशी चर्चा परिसरात सुरु आहे.

दरम्यान, या दोघीही येथून जवळच असणाऱ्या शेणवड खुर्द येथील रहिवासी असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी