28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्राईममुंबईत 19 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करुन हत्या; आरोपी सुरक्षारक्षकाने रेल्वेखाली केली आत्महत्या

मुंबईत 19 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करुन हत्या; आरोपी सुरक्षारक्षकाने रेल्वेखाली केली आत्महत्या

मुंबईत अगदी मंत्रालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सरकारी वसतीगृहात विद्यार्थिनीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मृत 19 वर्षीय विद्यार्थिनी मुळची अकोल्याची होती. ती मुंबईत शिक्षणासाठी आली होती. मरीन ड्राईव्ह येथे सावित्रिबाई फुले शासकीय वसतीगृहात ती राहत होती. या वसतीगृहाच्या सुरक्षा रक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार करुन तिची हत्या केली. त्यानंतर आरोपीने रेल्वे रुळाखाली स्वत: देखील आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

मरिन ड्राईव्ह येथील शासकीय वसतीगृहात मंगळवारी चौथ्या मजल्यावरील खोलीत विद्यार्थिनीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर वसतीगृहात मोठी खळबळ उडाली. संबंधीत घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत विद्यार्थिनी मुळची अकोल्याची होती. ती मुंबईत एका पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. मात्र ज्या वसतीगृहात ती राहत होती, त्या वसतीगृहाचा सुरक्षारक्षक प्रकाश कनोजिया याने विद्यार्थिनीवर तिच्या खोलीत जावून तिच्यावर अत्याचार केले, त्यानंतर तिची हत्या केली. त्यानंतर आरोपीने आपला मोबाईल फोन वसतीगृहातच ठेवून ग्रॅन्ट रोड आणि चर्नी रोड रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वेखाली आत्महत्या केली.

हे सुद्धा वाचा

जपानी नागरिक पैसे देऊन घेतायत हसण्याचे धडे; जाणून घ्या काय आहे नेमकं कारण,…

अवतार 2 आता ओटीटी फ्लॉटफॉर्मवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे येणार पाहता ?

चेहऱ्यावर लिंबू लावण्याचे आहेत ‘हे’ पाच फायदे; पण ‘या’ दुष्परिणामांपासून रहा सावध

दरम्यान मंगळवारी सकाळपासून विद्यार्थिनी खोलीबाहेर न आल्याने वसतीगृहातील इतर मुलींनी तिच्या खोलीकडे जावून पाहिले असता, खोलीला बाहेरुन कडी लावल्याचे दिसून आले. मुलींनी खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर विद्यार्थिनी विवस्त्र अवस्थेत पडल्याचे पाहून मुलींनी आरडाओरडा केला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. विद्यार्थिनीचा ओढणीने गळा आवळून खुन केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. पोलिसांनी विद्यार्थिनीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी