30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्राईममृत्यूनंतरही होताय 'ती'चा छळ; पाकमध्ये मुलींच्या कबरीला टाळे!

मृत्यूनंतरही होताय ‘ती’चा छळ; पाकमध्ये मुलींच्या कबरीला टाळे!

पाकिस्तानमध्ये मुलींच्या मृतदेहासोबत बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचा धक्कादायक आणि अत्यंत घृणास्पद प्रकार उघडकिस आला आहे. पालक भिती पोटी आपल्या मृत मुलींच्या कबरीला टाळे लावून असे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करीत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

डेली टाइम्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये नेक्रोफिलिया म्हणजेच मृतदेहासोबत लैंगिक संबंध ठेवण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र रक्षणासाठी पालक मुलींच्या कबरीभोवती कुंपण घालून टाळे ठोकत आहेत. पाकिस्तानात याआधीही नेक्रोफिलियाची प्रकरणे नोंदवली गेली असताना, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखकांसह काही नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.

सन 2011 मध्ये पाकिस्तानात नेक्रोफिलिया प्रकरणाची नोंद झाली होती, जेव्हा 48 महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केल्याची कबुली दिल्यानंतर मुहम्मद रिझवान नावाच्या कबरीस्तानच्या सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली. अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

नेक्रोफिलिया म्हणजे प्रेतांशी लैंगिक संबंध ठेवणे किंवा त्यांच्याकडे आकर्षित होणे. या धक्कादायक बलात्कार प्रकरणावर ऑनलाइन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींचे मत आहे की, ते शैतानी असू शकते. तर इतरांना वाटते की, हा एक असामान्य विकार असू शकतो.

हे सुद्धा वाचा:

काश्मीर हे पाकिस्तानला देऊन टाकावे अशी सरदार पटेल यांची भूमिका !

भारताच्या 5 पट महागाई दर असणारा ‘पाक’ विनाशाच्या उंबरठ्यावर: इम्रान खान

पाकिस्तानातही पंचमुखी हनुमानाचे चमत्कारिक मंदिर; 11 परिक्रमांचे रहस्य कायम

Necrophilia, or having sex with corpses, is on the rise in Pakistan, Parents put padlocks on daughters graves to avoid rape in pakistan

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी