30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeराजकीयकाश्मीर हे पाकिस्तानला देऊन टाकावे अशी सरदार पटेल यांची भूमिका !

काश्मीर हे पाकिस्तानला देऊन टाकावे अशी सरदार पटेल यांची भूमिका !

पंडित जवाहरलाल नेहरू मात्र काश्मीर हे भारतातच राहावे, याबाबत आग्रही होते

काश्मीर हे पाकिस्तानला देऊन टाकावे अशी सरदार पटेल यांची भूमिका होती, असा नवीन इतिहास समोर आला आहे. या इतिहासानुसार, पंडित जवाहरलाल नेहरू मात्र काश्मीर हे भारतातच राहावे, याबाबत आग्रही होते. (Sardar Patel Wanted Kashmir Part of Pakistan)

काश्मीर हा भारत पाकिस्तान संबंधात अगदी कळीचा आणि नाजूक मुद्दा आहे. भारतातील राजकारणात सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्त्ववादी संघटना सातत्याने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यामुळे काश्मीरची सध्याची स्थिती उत्पन्न झाल्याचा दावा करतात. मात्र, नव्याने समोर आणला गेलेला इतिहास काही वेगळेच सांगत आहे.

byjus.com

या नव्या इतिहासाने वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. हा नवा इतिहास लिहिला आहे तो अभिनेता शाहरुख खान हा ब्रॅंड अँबसिडर असलेल्या ‘बायजूज’ (दक्षिण भारतीय उच्चार बैजूज) या Ed-Tech म्हणजेच शिक्षण क्षेत्रातील स्टार्ट अप आयटी कंपनीने. ‘बायजूज’तर्फे प्रशासकीय सेवा म्हणजे आयएएस अधिकारी परीक्षेसाठी (BYJU’S IAS) प्रशिक्षण वर्ग चालविले जातात. त्यातील “स्वतंत्रता के बाद का इतिहास” या हिंदी पुस्तकात “कश्मीर मुद्दा” या प्रकरणात ‘बायजूज’ने इतिहासावर नव्याने प्रकाश टाकला आहे. पृष्ठ क्रमांक 48 वर हा नवा इतिहास नमूद आहे.

Register For Free

हे सुद्धा वाचा :

काश्मीरमधील हत्यासत्रावर ‘काश्मीर फाईल्स २’ काढावा : संजय राऊत

कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात बाहेरच्यांनी एकही भूखंड खरेदी केला गेला नाही; राज्यसभेत सरकारची माहिती

संतापजनक : शाहरुख खानच्या बायकोने मराठीची केली ऐसीतैशी!

1. परिचय, 2. पार्श्वभूमी, 3. काश्मीरवर व्यावहारिक आक्रमण, 4. बाह्य आणि अंतर्गत विवाद, 5. 1948 पासूनचे राजकारण, 6. बंडाचा उदय अशा सहा भागात “कश्मीर मुद्दा” या प्रकरणाची मांडणी ‘बायजूज’च्या पुस्तकात करण्यात आली आहे. ‘बायजूज’ने उजेडात आणलेल्या नव्या इतिहासानुसार, काश्मीर हा भारताचा भाग असावा असे नेहरूंना नेहमीच वाटत असले, तरी ते पाकिस्तानात सामील व्हावे, असे पटेलांचे मत होते. बायजूजमधील या वादग्रस्त नव्या इतिहासाची बोंब फुटल्यानंतर आता सोशल मीडियावर #बायकॉट_बायजूज आणि #बायकॉट_शाहरुख असे ट्रेंड सोशल मीडियावर चालविण्याची तयारी सुरू झालेली दिसतेय. ‘बायजूज’ने तूर्तास या विषयावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. ‘बायजूज’कडून माफीनामा आलेला नाही किंवा हा वादग्रस्त इतिहास असलेले आयएएस संदर्भ पुस्तक मागे घेण्याचे काहीही सूतोवाच करण्यात आलेले नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी