31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeव्यापार-पैसाआता ऑनलाइन जेवणसाठी मोजावे लागणार एक्स्ट्रा चार्जेस!

आता ऑनलाइन जेवणसाठी मोजावे लागणार एक्स्ट्रा चार्जेस!

शहरातल्या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये आपण एकदा तरी घरी बसून आपल्या आवडीची डिश Swiggy आणि  Zomato सारख्या फूड डिलिव्हरी प्लॅटफाॅर्मवरून मागविली असेल. पण आता ‘फूड लवर्स’ साठी एक वाईट बातमी समोर आली आहे. आता स्विगीवरून जेवण ऑर्डर करणं महाग पडू शकतं. कारण स्विगीनं काही शहरात जेवण ऑर्डरवर चार्जेस वाढवले आहेत. हे चार्जेस नेमकं किती वाढवले? जेवण किती महाग पडू शकत? हे जाणून घेऊया.

ऑनलाइन जेवण ऑर्डर केल्यास आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. फूडटेक कंपनी स्विगीने बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये फूड ऑर्डरवर 2 रुपये प्लॅटफॉर्म शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. हे शुल्क केवळ खाद्यपदार्थांच्या ऑर्डरवरच आकारलं जात आहे. स्विगीच्या क्विक कॉमर्स व्हर्टिकल, इन्स्टामार्टवर दिलेल्या ऑर्डरवर शुल्क आकारलं जात नाही. याशिवाय, हे प्लॅटफॉर्म शुल्क स्विगी वन युझर्सनादेखील लागू केले जात आहे, जे पेड मेंबरशीपअंतर्गत येतं.

स्विगीच्या प्रवक्त्यानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्लॅटफॉर्म फी हे खाद्यपदार्थांच्या ऑर्डरवर नाममात्र फ्लॅट चार्ज आहे. हे शुल्क आम्हाला आमचे प्लॅटफॉर्म ऑपरेट करण्यात आणि त्यात सुधारण्यात मदत करेल. तसंच याद्वारे आम्हाला ॲपची फिचर्स वाढवण्यासही मदत मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली. स्विगी आपल्या नफ्याचं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, कंपनी लवकरच शेअर बाजारात एन्ट्री घेण्याच्या तयारीत असल्याच्याही चर्चा आहेत. यामुळे कंपनी असे उपक्रम राबवत आहे.

हे सुद्धा वाचा: 

Packaged Food : रेडी टू इट फूड आरोग्यासाठी हानिकारक का आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

Chinese food : सावधान ! तुम्ही चायनीज पदार्थ आवडीने खाताय ; मग हे वाचा

मॅगीनंतर आता अंडयावर प्रयोग: वेफर ऑमलेटची रेसिपी पाहून खवय्ये संतापले; सोशल व्हायरल

Swiggy Increased charges on Online Food Delivery, Swiggy: Extra charges for online dining

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी