35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्राईमराजीव गांधींसारखे मोदींना बॉम्बने उडवून देऊ; पंतप्रधानांना धमकीचे पत्र

राजीव गांधींसारखे मोदींना बॉम्बने उडवून देऊ; पंतप्रधानांना धमकीचे पत्र

केरळ भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान मोदींच्या दोन दिवसीय केरळ दौऱ्यात प्राणघातक हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारपासून (24 एप्रिल) पंतप्रधान मोदींचा दोन दिवसीय केरळ दौरा सुरू असणार आहे. या धर्तीवर धमकीचे पत्र मिळाल्यानंतर राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 24 एप्रिलपासून दोन दिवसीय केरळ दौरा सुरू असणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील आणि कोची वॉटर मेट्रोचे उद्घाटन करतील. मात्र केरळच्या भाजप कार्यालयाला धमकीचे पत्र आल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी, 22 एप्रिल रोजी ही माहिती समोर आली. ‘पीएम मोदींवर जीवघेण्या हल्ल्याची धमकी देणारे पत्र मिळाले’, असा दावा करत हे पत्र पोलिसांना सुपूर्द करण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पत्रावर कोचीचे रहिवासी एन.के. जॉनी याचे नाव आणि पत्ता निदर्शनास आले. दरम्यान, पत्राद्वारे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासारखा हल्ला मोदींवर करण्याची धमकी देण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला असता, त्यांनी असे पत्र लिहिल्याचा साफ इन्कार करत हे पत्र कोणीतरी आपले नाव वापरून लिहिले असावे, अशी खात्री व्यक्त केली. दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांनी संशयिताच्या हस्ताक्षराची तुलना पत्राच्या हस्तलेखनाशी केली. मात्र त्याने ते पत्र लिहिले नाही, असे निष्पन्न झाले. यावर जॉनी म्हणाला की, त्याच्याशी शत्रुत्व असलेल्या कोणीतरी पत्रात त्याचे (जॉनी) नाव लिहिले असावे आणि तो या धमकीसाठी जबाबदार असू शकतो. जॉनीने काही लोकांची नावेही पोलिसांना सांगितली ज्यांच्यावर त्याला संशय आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांड
1991 साली भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी जी.के.सोबत आगामी निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. राजीव श्रीपेरुंबदुर येथे प्रचार रॅलीत पोहोचले, तेव्हा त्यांनी आपली कार सोडली आणि ते भाषण देणार असलेल्या व्यासपीठाकडे चालू लागले. वाटेत अनेक हितचिंतक, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि शाळकरी मुलांनी त्यांना पुष्पहार अर्पण केला. मारेकरी धनू थेनमोझी राजरत्नमजवळ आला आणि त्याला नमस्कार केला. त्यानंतर ती त्याच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकली आणि रात्री ठीक 10:10 वाजता तिच्या ड्रेसच्या खाली बांधलेल्या RDX स्फोटकांनी भरलेल्या बेल्टचा स्फोट केला. 21 मे 1991 रोजी चेन्नई येथील श्रीपेरंबदुर येथे झालेल्या या आत्मघाती बॉम्बस्फोट हल्ल्यामुळे राजीव गांधी व्यतिरिक्त किमान 20 जणांना आपला जीव गमवावा लागला.

हे सुद्धा वाचा: 

‘महागाई मॅन’ मोदीचा कहर

बोफोर्स घोटाळ्यामुळे राजीव गांधींचे पंतप्रधान पद हुकले होते

Rajiv Gandhi Case : राजीव गांधींच्या हत्येतील दोषींबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

PM Modi gets threat to kill with a bomb like Rajiv Gandhi, Narendra Modi, Rajiv Gandhi, KERLA, BJP, CONGRESS, K. Surendran

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी