33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रMPSC करिअरचे राजकारण; 90 हजारहून अधिक विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लीक?

MPSC करिअरचे राजकारण; 90 हजारहून अधिक विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लीक?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. MPSC विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र अर्थात हॉल तिकीट लीक झाले आहे. समाजमाध्यमांवर अनेक विद्यार्थ्यांची माहिती लीक झाली आहे. एका टेलिग्राम चॅनेलवर ही हॉल तिकीट अपलोड करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यासोबतच, एमपीएससी परीक्षेचा पेपर देखील लीक झाल्याचा दावा विद्यार्थी आणि काही राजकीय नेत्यांनी केला आहे.

टेलिग्राम चॅनलवर सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांचे हॉल तिकिटाचा डेटा लिक झाला आहे. हा फक्त नमुना डेटा आहे. तसेच आमच्याकडे सर्व MPSC विद्यार्थ्यांची अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे, असा दावा टेलिग्राम चॅनलवर तयार करण्यात आलेल्या ग्रुपवर करण्यात आला आहे. याशिवाय, पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका 2023 देखील उपलब्ध आहे, असा मोठा दावा या चॅनलवर करण्यात आला आहे.

मुख्यतः 30 एप्रिलला होणाऱ्या #MPSC चे परीक्षेचे हॉल तिकीट एकाच वेळी लीक होणे हा निंदनीय प्रकार आहे. login किंवा OTP शिवाय हॉल तिकीट डाउनलोड होत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची लवकरात लवकर शहानिशा करावी. सत्य काय आहे ते हे सामोरे आणावे, अशी मागणी विद्यार्थी गटातून करण्यात येत आहे. दरम्यान या माहितीनुसार, या टेलिग्राम चॅनलवर सुमारे एक लाख विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटासह वैयक्तिक माहिती लिक झाली असून, प्रश्नपत्रिकाही उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे.

संबंधित घटनेची दखल घेत प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एक ट्विट करण्यात आले असून, यासंदर्भात खुलासा करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी नियोजित विषयांकित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनेलवर प्रसिध्द होत असल्याची बाब आज रोजी निदर्शनास आली आहे. सदर बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. सदर चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य विदा (डेटा) लिक झालेला नाही, याची तज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे.

दरम्यान, 30 एप्रिल रोजी MPSCची संयुक्त परीक्षा होणार आहे. मात्र, या व्हायरल झालेल्या माहितीनंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे. अशा पद्धतीने माहिती लिक होणे हा प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे. संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : 

2023 पासूनच MPSC परीक्षा नवीन पॅटर्ननुसार : राज्य लोकसेवा आयोगाचे ट्विट आणि मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील उत्तरात विसंगती!

अजितदादा, निवडणूक आयोग नाही, MPSC बोललो बरं का; मुख्यमंत्री

MPSC बाबत मोठी अपडेट, नवी परीक्षापद्धत २०२५ पासून लागू करण्यास सरकार राजी

MPSC exam students data leak on telegram and mpsc clarification on these claims, MPSC Exam 2023

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी