29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्राईमशिल्पा शेट्टीच्या जुहू येथील बंगल्यातून मौल्यवान वस्तूंची चोरी

शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील बंगल्यातून मौल्यवान वस्तूंची चोरी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा हिचे मुंबईतील उच्चभ्रू ठिकाण असलेल्या जुहू येथील बंगल्यातून काही मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याचे समोर आले आहे. शिल्पा शेट्टीने याबाबत पोलिसांत तक्रार नोंदविली होती. त्यांनंतर पोलिसांनी या चोरी प्रकरणी दोघाजणांना ताब्यात घेतले आहे.

शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील बंगल्यामधून काही मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याची तक्रार गेल्या आठवड्यात जुहू पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी दोघाजणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे या चोरीप्रकरणी तपास सुरु आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाच्या डिजीटल माध्यमावर प्रसिद्ध झाले आहे.

हे सुद्धा वाचा

माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी माऊलींच्या वारीत दंग:टाळ मृदुंगाच्या तालावर धरला ठेका

महाराष्ट्र प्रिमियर लीगचा आजपासून थरार, कधी आणि कुठे पाहता येणार सामने

मुंबई लोकल मध्ये 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार,आरोपी अटकेत

शिल्पा शेट्टी बॉलिवूडमधले आघाडीचे नाव आहे. ती सध्या केडी : द डेव्हिल चित्रपटात काम करत आहे. ध्रव सर्जा यांचा हा चित्रपट असून शिल्पा शेट्टी तब्बल 18 वर्षानंतर ती कन्नड चित्रपटसृष्टीत पून्हा पदार्पण करत आहे. शिल्पा शेट्टी मुळची कर्नाटकमधील असून नव्वदच्या दशकात तीने बॉलीवूडमध्ये पदापर्ण केले. 90 दशकात ती बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर तीने मागे वळून पाहिले नाही. ब्रिटनमधील बिग बॉस शोमुळे माध्यमांमध्ये तिच्या नावाची चर्चा झाली. सन 2009 साली उद्योगपती राज कुंद्रासोबत तीने विवाह केला. शिल्पा शेट्टीला दोन मुले आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी