33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्राईमदर्शना पवारच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम

दर्शना पवारच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार हीचा मृतदेह रविवारी सकाळी कुजलेल्या अवस्थेत राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सापडला होता. या तरुणीचा खून झाला असल्याचे तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये निष्पन्न झाले असून पोलिसांना तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यावर संशय आहे. राहुल हा गेल्या काही दिवस पासून फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली आहेत.

दर्शना पवार हिने यंदाच्या एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता. वन अधिकाऱ्याची पोस्ट तिला मिळाली होती. या नंतर 9 जून रोजी स्पॉटलाईट अॅकॅडमी येथे तिचा सत्कार करण्यात आला होता. 12 जून रोजी दर्शना आणि तिचा मित्र राहुल हांडोरे हे ट्रेकिंगसाठी राजगड किल्ल्यावर गेले होते. दर्शनाने तिची मैत्रिण आणि कुटुंबियांना याबाबत सर्व सांगितले होते. यानंतर तिच्या सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर तिचा फोन बंद लागत होता. त्यानंतर अनेक तास उलटून गेल्या नंतर ही तिच्यासोबत काहीही संपर्क न झाल्यामुळे तिच्या कुटुंबियानी सिंहगड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर 18 जूनला तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. तिच्या वडिलांनी या मृतदेहाची ओळख पटवली.

पुढील तपासात राजगडाजवळील एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता राहुल आणि दर्शना सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी राजगडच्या पायथ्याशी दोघेही राजगड चढायला जाताना दिसत आहेत मात्र सकाळी 10 वाजताच्या सुमारास राहुल एकटाच गडावरुन खाली येताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांना दर्शनाचा मित्र राहुल याच्यावर संशय आहे. राहुल हांडोरे याचा फोन बंद येत असून त्याचे लोकेशन दुसऱ्या राज्यात दाखवत आहे. त्याने त्याच्या कुटुंबियांना दुसऱ्या फोन वरुन फोन करून माझ्या या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे.

हे सुध्दा वाचा:

भवानी देवीने रचला इतिहास, तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये पटकावले कांस्यपदक

औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल करणारे ‘औरदंगाबाद’ आहेत, उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

वसतिगृहातील अल्पवयीन मुलींचा शिक्षकांवर आरोप,पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचायला सांगतात

राहुल हा मुळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शाहवादी गावचा आहे. तो पुण्यात एमपीएससीची तयारी करत असताना त्याची ओळख दर्शना सोबत झाली होती. दोघांमध्ये चांगली मैत्री होती आणि याच ओळखीतून दोघे एकत्र ट्रेकिंगला गेले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी