30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeक्रीडाभवानी देवीने रचला इतिहास, तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये पटकावले कांस्यपदक

भवानी देवीने रचला इतिहास, तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये पटकावले कांस्यपदक

सी.ए. भवानी देवी यांनी सोमवारी आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन मिसाकी एमुराचा पराभव करून आणि भारताला या स्पर्धेत कांस्यपदक मिळवून देऊन इतिहास रचला. भारतीय तलवारबाजीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या खेळाडूला 15-10 असे पराभूत करत महिलांच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यापूर्वी भवानीने मिसाकीविरुद्धचे तिन्ही सामने गमावले होते.या चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी भवानी ही पहिली भारतीय खेळाडू बनली आहे.

भवानी देवीने आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये चांगली एन्टी घेतली आहे. भवानीनेही प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भवानी देवीने जापानच्या सिरी ओजाकी हिचा 15-11 असा पराभव केला होता. सिरी ही 2022 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये ब्रॉन्ज पदक जिंकणाऱ्या संघाची सदस्य होती. टोक्यो ऑलम्पिकमध्ये भवानीला पदक मिळवण्यात अपयश आले होते. आठ वेळा नॅशनल चॅम्पियन असणाऱ्या भवानी देवीनं कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप टीम इवेंट्समध्ये एक सिल्वर आणि एक कांस्य पदक जिंकलं होतं. तर याच चॅम्पियनशिपच्या इंडिव्ह्युजअल इवेंटमध्येही भवानीच्या नावावर एका कांस्य पदक आहे. भवानी देवीनं 2010 च्या एशियन तलावारबाजी चॅम्पियनशीपमध्ये तिने कांस्यपदक जिंकलं होतं.

हे सुध्दा वाचा:

वसतिगृहातील अल्पवयीन मुलींचा शिक्षकांवर आरोप,पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचायला सांगतात

गद्दार दिनावरुन संजय राऊत आणि नितेश राणेंमध्ये कलगीतुरा

भगतसिंह यांची प्रेरणा चंद्रशेखर आझादच ! सुधीर मुनगंटीवार

भवानीदेवीच्या या विजयानंतर फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी तिचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, भारतीय तलवारबाजीसाठी हा अतिशय अभिमानाचा दिवस आहे. याआधी अशी कामगिरी कुणी केली नव्हती. मात्र भवानीने ती करुन दाखविली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी