29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeक्राईमअवैध सावकारीच्या माध्यमातून खंडणी उकळणाऱ्या वैभव देवरे इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात!

अवैध सावकारीच्या माध्यमातून खंडणी उकळणाऱ्या वैभव देवरे इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात!

अवैध सावकारीच्या माध्यमातून खंडणी उकळणाऱ्या वैभव देवरेला इंदिरानगर पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे. रविवारी (ता.२१) देवरे यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली होती. दरम्यान, पोलिस संशयित देवरे यांच्या पत्नीचाही शोध घेत आहेत. संशयित देवरे यास खंडणीच्या गुन्ह्यात रविवारी (ता.२१) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. इंदिरानगर पोलिसांनी सोमवारी (ता.२२) सकाळी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा देवरे याला ताब्यात घेत अटक केली. जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने देवरे यास गुरुवारपर्यंत (ता.२५) चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अवैध सावकारीच्या माध्यमातून खंडणी उकळणाऱ्या वैभव देवरेला (Vaibhav Devre) इंदिरानगर पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे. रविवारी (ता.२१) देवरे यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली होती. दरम्यान, पोलिस संशयित देवरे यांच्या पत्नीचाही शोध घेत आहेत. संशयित देवरे यास खंडणीच्या गुन्ह्यात रविवारी (ता.२१) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. इंदिरानगर पोलिसांनी सोमवारी (ता.२२) सकाळी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा देवरे याला ताब्यात घेत अटक केली. जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने देवरे यास गुरुवारपर्यंत (ता.२५) चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.(Vaibhav Devre arrested by Indiranagar police for extorting money through illegal money lenders)

अव्वाचे सव्वा दराने व्याज आकारून कर्जदाराची मालमत्ता बळकावून, परत खंडणी मागणाऱ्या वैभव देवरे याच्या १५ बँक खात्यांवरील सुमारे २० लाखांची रक्कम पोलिसांनी गोठविली (सीझ) आहे. त्याचप्रमाणे, आत्तापर्यंतच्या तपासातून पोलिसांकडे देवरे याने जमा केलेली माया पाहता ती त्याच्या उत्पन्नापेक्षा कित्येक पटीने अधिक असल्याचे समोर आल्याने पोलिस यासंदर्भात प्राप्तीकर विभागाची (आयटी) मदत घेत या तपासामध्ये समाविष्ट करून घेणार आहे. खंडणीखोर वैभव देवरे याच्याविरोधात आत्तापर्यंत ५ गुन्हे दाखल झाले असून, यात एका विनयभंगाच्या गुन्ह्याचाही समावेश आहे. देवरे याने अनेकांना १० टक्के दरमहा व्याजाने पैसे दिल्यानंतर त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा दराने पैसे उकळले. अनेकांची मालमत्ता स्वत:सह पत्नी, सासू, साल्याच्या नावावर करून घेतल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. देवरे याच्या १५ बँक खात्यांवरील २० लाखांची रक्कम गोठविण्यात आली आहे.त्याचप्रमाणे आत्तापर्यंत त्याच्याकडून ७ वाहने, एक फार्महाऊस, तीन फ्लॅट, एक रो-हाऊस अशी मालमत्ता असल्याचे समोर आले आहे.तीन फ्लॅट,एक रो-हाऊस अशी मालमत्ता असल्याचे समोर आले आहे .

या गुन्ह्याचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक बारेला या करीत आहेत. अवैध सावकारी करणाऱ्या वैभव देवरे याच्याकडून एका महिलेने १० टक्के व्याजाने पैसे घेतले होते. पीडित महिलेने त्यास व्याजासह पैसे दिल्यानंतर देवरे त्यांच्याकडे जादा पैशांची मागणी करीत होता. महिलेच्या घरी जाऊन शिवीगाळ करीत अश्लील वर्तन करीत होता. त्यातून त्याने महिलेची कार बळजबरीने ओढून आणली होती. त्यानंतरही तो महिलेकडे जादा पैशांची मागणी करीत त्रास देत त्यांचा अश्लील भाषेत बोलून त्यांचा विनयभंग केला होता. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात जबरी चोरी व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी