31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeमनोरंजनDance Deewane : वर्णभेदाच्या व्हिडीओवर राघव जुयाल नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, राघवने दिले याबाबत...

Dance Deewane : वर्णभेदाच्या व्हिडीओवर राघव जुयाल नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, राघवने दिले याबाबत स्पष्टीकरण

टीम लय भारी

मुंबई : कलर्स टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘डान्स दिवाने’ शो वरील एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रसिद्ध डान्सर आणि रियालिटी शो मध्ये सूत्रसंचालन (host) करणाऱ्या राघव जुयाल दिसत आहे. यात राघव वर्णभेद करत असल्याची १० सेकंदाची क्लिप आहे. मात्र राघवने नेटकऱ्यांचे दावे हणून पाडत, या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे (Dance Deewane: Raghav Juyal gave an explanation on viral video).

राघव आसामच्या गुवाहाटी येथे राहणाऱ्या गुंजन सिन्हा नामक मुलीला रियालिटी डान्स शोमध्ये इंट्रोड्युस करत असतो. इंट्रोड्युस करताना राघव त्या मुलीला ‘चायनीज’ भाषा येते का? असे विचारतो. परंतु, राघवच्या या व्हिडीओ क्लिपला सुप्रीम कोर्टाचे एडवोकेट शशांक शेखर झा यांनी शेअर करत एक मजकूर लिहिला आहे. ” आसाम मधून आलेल्या गुंजन सिन्हा नावाच्या मुलीला चायनीज बोलून, खूप वाईट प्रकारे डान्स रियालिटी शो डान्स दिवानेमध्ये इंट्रोड्युस केले आहे. वरून राघवच्या या विधानावर माधुरी दीक्षित आणि रेमो डिसुझा यावर हसत होते.”

जुही चावला झाली अलिबागकर,विकत घेतलेल्या जागेची किंमत घ्या जाणून

माधुरी दीक्षितच्या मुलाने केस दान करत दाखविली उदारता, माधुरीने शेअर केला व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Raghav Juyal (@raghavjuyal)

मात्र राघवने या व्हिडिओ क्लिप मागचे स्पष्टीकरण नेटकऱ्यांना सांगत त्याने स्वतःचा व्हिडीओ शेअर केला आहे. “जेव्हा मुलं शोमध्ये येतात, तेव्हा आम्ही त्यांना त्यांची आवड वगरे विचारतो. हाच प्रश्न गुंजनलाही शोच्या पहिल्या भागात विचारण्यात आला होता. तेव्हा गुंजनने आपलयाला चायनीज भाषा बोलता येते असे सांगितले. यावर आम्ही तिला नेहमी बोलायचो की, चायनीज भाषेमध्ये बोलून दाखव. याच कारणामुळे मी शोच्या शेवटच्या भागात तिच्याशी चायनीज भाषेत बोललो.” असे राघव म्हणाला.

प्राजक्ता गायकवाडचा ‘साजनी’ अंदाज, नवे गाणे प्रदर्शित

Dance Deewane: राघव जुयाल की कंटेस्टेंट पर कथित ‘नस्लवादी’ टिप्पणी को लेकर बरपा हंगामा, एक्टर को देनी पड़ी सफाई

त्याचबरोबर राघवने या व्हिडीओ क्लिपमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असलेल्यांची माफी मागितली आहे. मी स्वतः उत्तर पूर्व भारतीयांशी कनेक्टेड आहे. माझे नातेवाईक आणि मित्र सिक्कीम येथे राहणारे आहेत. मी नेहमी सत्याची साथ दिली आहे. नेहमी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला असल्याचे राघवने म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी